स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला उद्देशून पहिले भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, अलिकडच्या काळात जगाने एक नवीन भारत उगवताना पाहिला असल्याचे म्हटले. तसेच आधुनिक भारताच्या निर्मात्यांनी प्रत्येक प्रौढ नागरिकाला राष्ट्रनिर्मितीच्या सामूहिक प्रक्रियेत सहभागी होण्यास सक्षम केले आहे. भारतामुळेच जगाला लोकशाहीची खरी क्षमता कळली असल्याचंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!

भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. ”आपण सर्वांनी स्वतंत्र भारतात श्वास घेण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु आपण स्वातंत्र्यापासूनच सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्वीकारला. त्यामुळे आपण आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे.”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “महत्त्वाची खाती भाजपाकडे, शिंदे गटाला दुय्यम स्थान, सन्मान कमी झाला?” खातेवाटपावरून अमोल मिटकरींची खोचक टीका

”भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगातील अनेकांना भारतात लोकशाही यशस्वी होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, शंका उपस्थित करणाऱ्यांना आपण चुकीचं सिद्ध केले आहे. आज भारतामुळेच जगाला लोकशाहीची क्षमता समजली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात जगात कोरोना महामारीने थैमान घातले होते. यावेळी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात पार पडली. गेल्या महिन्यात भारताने २०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला. कोरोनाच्या सामना करताना भारताने जगातील अनेक विकसीत देशांपेक्षा चांगली परिस्थिती हाताळली आणि आज भारत पुन्हा वेगाने वाटचाल करत आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – ‘ब्राह्मणांची पोरं…’ फडणवीस यांच्यावर टीका करताना कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली

”आपल्याकडे जे काही आहे, ते आपल्या मातृभूमीने दिले आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी, प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.