रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आता पेट घेत चाललं आहे. रशियाने युक्रेनच्या केवळ लष्करी भागातच नव्हे तर रहिवासी भागातही आपलं सैन्य घुसवलं आहे. त्यामुळे युक्रेनसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या देशातल्या नागरिकांना युक्रेन-रशियातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने रशियाला या प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. आता चीननेही अशीच भूमिका घेतली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना फोन केला आहे. जिनपिंग यांनी पुतिन यांना युक्रेनसोबत वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”
donald trump dictator
“बराक ओबामा ISIS चे संस्थापक, मॉस्कोतील मृतांना तेच जबाबदार”, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हीडिओ व्हायरल!

लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले आहे. कारण रशियाने आपली लष्करी कारवाई सुरू ठेवली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे सैन्य ईशान्य आणि पूर्वेकडून युक्रेनची राजधानी कीवजवळ येत आहे. तर युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवली की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.