scorecardresearch

Premium

उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

सनातन धर्मावरुन पुन्हा एकदा उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका

What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांनी मदुराईत काय म्हटलं आहे? (फोटो-ANI)

नव्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळासह आणि सर्वपक्षीय खासदारांसह मंगळवारी प्रवेश केला. त्याआधी त्यांनी जुन्या संसदेत भाषणही केलं. तसंच नव्या संसदेत म्हणजेच सेंट्रल व्हिस्टामध्ये नरेंद्र मोदी आणि सगळे खासदार जेव्हा गेले त्याचवेळी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. त्यावर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच हाच का तुमचा सनातन धर्म? असा प्रश्न विचारत उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे.

काय म्हटलं आहे उदयनिधी स्टॅलिन यांनी?

“संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. भाजपाने तामिळनाडूतून अधीनम बोलवले होते. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. कारण त्या विधवा आहेत आणि आदिवासी जमातीच्या आहेत. हाच का तुमचा सनातन धर्म? आम्ही या विरोधात आमचा आवाज उठवत राहू.” असं म्हणत तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपावर आणि मोदीसरकारवर टीका केली आहे. आज उदयनिधी स्टॅलिन हे मदुराईतल्या एका कार्यक्रमात गेले होते. तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Uddhav Thackeray Narendra Modi (2)
“काँग्रेस हे गंजलेलं लोखंड, तर भाजपा…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल
sharad pawar
महिला आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य; पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, शरद पवार यांचे प्रतिपादन
sanjay raut prafull patel sharad pawar
नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट, ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले…
Jayant Pati
“राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, पण…”, जयंत पाटलांची टीका

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरुन काही दिवसांपूर्वीही भाजपावर टीका केली होती. त्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून त्यांना बोलवलं नाही असा आरोप केला आहे आणि हाच का तुमचा सनातन धर्म आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावरुन पुन्हा नवा वाद होण्याची चिन्हं आहेत.

१६ सप्टेंबरला काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्याचा विरोध करता येत नाही, त्यामुळे तो संपवायला हवा. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे, सनातन धर्मालाही संपवायचं आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: President of india was not invited in new parliament because she is a widow and is from tribal community is this sanatan dharma asks udaynidhi stalin scj

First published on: 20-09-2023 at 22:05 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×