नवी दिल्ली : केंद्रीय गृहबांधणी व नागरी विकास मंत्रालयाने संसदेच्या नव्या इमारतीच्या अंतरंगाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे सत्र तरी नव्या जोशात सुरू होऊ शकते. यासंदर्भात केंद्र सरकारने अजूनही संदिग्धता कायम ठेवली असली तरी, राष्ट्रपतींचे अभिभाषण नव्या इमारतीमध्ये होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

‘सेंट्रल विस्ता’ प्रकल्पाअंतर्गत संसदेची नवी इमारत बांधली जात असून गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये घेण्याचा मनोदय केंद्र सरकारकडून व्यक्त केला गेला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनापर्यंत बांधकाम पूर्ण न झाल्याने संसदभवनाच्या जुन्या इमारतीमध्ये संपूर्ण अधिवेशन घेतले गेले. नव्या वर्षांतील पहिले अधिवेशन म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पाही जुन्या इमारतीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाचा अर्थसंकल्प जुन्या इमारतीमध्ये सादर करतील, असे समजते.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू होत असून पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल तसेच, आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केले जाईल. दुसऱ्या दिवशी, १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल. संसदेच्या नव्या इमारतीच्या अंतरंगातील काम पूर्ण झाले तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा नव्या इमारतीमध्ये घेतला जाऊ शकतो. नव्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी खासदारांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून ती लवकरच उपलब्ध करू दिली जाणार आहेत. नव्या संसदभवनामध्ये मध्यवर्ती सभागृह नसेल पण, दोन्ही सदनांतील सदस्य बसू शकतील एवढी लोकसभेच्या सभागृहाची क्षमता असल्याने इथेच राष्ट्रपतींचे अभिभाषण होऊ शकेल.