Presidential Election Result Live, 21 July 2022 : भारताच्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज त्याची मतमोजणी करण्यात येणार आहे. अवघ्या देशाचं लक्ष या मतमोजणीकडे लागलं आहे. आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागलं आहे.

Live Updates

Presidential Election 2022 Result Live : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? भारताला मिळणार नवीन राष्ट्रपती

15:56 (IST) 21 Jul 2022
खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण, द्रौपदी मुर्मू आघाडीवर

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीमधील पहिला टप्पा पूर्ण झाला असून खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीमध्ये द्रौपदी मुर्मू आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.

12:59 (IST) 21 Jul 2022
Presidential Election Results Live : पहिल्या टप्प्यात खासदारांच्या मतांची मोजणी...

मतपेट्या उघडून पहिल्या टप्प्यात खासदारांच्या मतांची मोजणी...

https://twitter.com/ANI/status/1550018072681287680

12:49 (IST) 21 Jul 2022
Presidential Election Results Live : मतमोजणी सुरू झाल्यानंतरची छायाचित्रे...

मतमोजणी सुरू झाल्यानंतरची काही छायाचित्रे...

https://twitter.com/ANI/status/1550016519153004544

12:45 (IST) 21 Jul 2022
Presidential Election Results Live : द्रौपदी मुर्मू यांचा विजय साजरा करण्यासाठी २० हजार लाडू!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यास तो साजरा करण्यासाठी ओडीसामधील त्यांचं गाव असलेल्या रायरंगपूरमध्ये तब्बल २० हजार लाडू तयार करण्यात येत आहेत.

12:17 (IST) 21 Jul 2022
Presidential Election Results Live : कशी होतेय मतमोजणी?

आधी आमदार-खासदारांच्या मतांची मोजणी होणार. त्यानंतर राज्यांमधील आमदारांच्या मतांची मोजणी केली जाईल. १० राज्यांच्या गटांमध्ये सर्व राज्यांमधील आमदारांच्या मतांची मोजणी केली जाईल. प्रत्येक टप्प्यावर निवडणूक अधिकारी माध्यमांना माहिती देतील.

12:14 (IST) 21 Jul 2022
द्रौपदी मुर्मू यांच्या रायरंगपूरमधील घरी उत्सवाचं वातावरण!

द्रौपदी मुर्मू यांच्या रायरंगपूरमधील घरी उत्साहाचं वातावरण. मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

11:55 (IST) 21 Jul 2022
जर द्रौपदी मुर्मू निवडणूक जिंकल्या, तर...

जर द्रौपदी मुर्मू निवडणूक जिंकल्या, तर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरतील.

11:54 (IST) 21 Jul 2022
राष्ट्रपतीपदासाठीच्या मतमोजणीला सुरुवात

राष्ट्रपतीपदासाठीच्या मतमोजणीला सुरुवात...

11:25 (IST) 21 Jul 2022
आपचा राज्यसभेत शून्य प्रहर प्रस्ताव!

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून आपनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप करत राज्यसभेत शून्य प्रहर प्रस्ताव मांडला.

https://twitter.com/ANI/status/1549995009944223744

11:05 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीसंदर्भात यशवंत सिन्हा यांचं ट्वीट!

सोनिया गांधींची आज ईडीकडून चौकशी केली जाणार असून त्यासंदर्भात विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी टीका करणारं ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/YashwantSinha/status/1549984607323377665

10:49 (IST) 21 Jul 2022
११ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार...

राष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

10:41 (IST) 21 Jul 2022
१० राज्यांमध्ये १०० टक्के मतदान

राष्ट्रपतीपदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या दहा राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.

10:39 (IST) 21 Jul 2022
...ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट - संजय राऊत

द्रौपदी मुर्मू चांगल्या मतांनी जिंकतील. एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदावर विराजमान होणं ही आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

10:37 (IST) 21 Jul 2022
काय आहेत निवडणुकीमागची राजकीय समीकरणं?

देशाचे १६ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

वाचा सविस्तर

draupadi murmu yashwant sinha

सोमवारी पार पडलं मतदान

Presidential Election 2022 Result Live : राष्ट्रपतीपदाच्या मतमोजणीसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट!