अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका नागरिकाने विमानात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. वरुण असं या ३८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. आता या वरुणला ७ मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
२०२४ मध्ये वरुण नावाच्या या भारतीय तरुणाने विमानात असताना त्याच्या सहप्रवासी महिलेचा विनयभंग केला होता. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने वरुणला या प्रकरणात दोषी ठरवलं आहे.या प्रकरणी अंतिम सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. ७ मे रोजी वरुणला शिक्षा सुनावली जाईल. अमेरिकेत वरुण राहतो पण त्याच्याकडे वैध नागरिकता नाही अशीही बाब समोर आली आहे. शिवाय या प्रकरणात वरुणला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते अशीही शक्यता आहे. ७ मे रोजी या प्रकरणात शिक्षा सुनावली जाणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
विमानात वरुण नावाच्या तरुणाने केला महिलेचा विनयभंग
व्हर्जिनिया येथील अमेरिकेच्या अटॉर्नी कार्यालयाने एक निवेदन जारी केलं आहे. ज्यानुसार मागील गुरुवारी म्हणजेच २९ जानेवारीला वरुण नावाच्या तरुणाला विनयभंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. २०२४ मध्ये रोनाल्ड रीगन वॉशिंग्टन या ठिकाणाहून ज्या विमानाने उड्डाण केलं होतं त्या विमानात ही घटना घडली होती. वरुणने एका महिला विमानात झोपली होती तेव्हा तिचा विनयभंग केला. ज्यानंतर तिला जाग आली. पीडित महिलेने सांगितलं की वरुणने स्लीप मास्क घातला होता आणि तो वारंवार त्याचे हात तिच्या अंगावर टाकत होता. हात हटवूनही वरुण झोपण्याचं नाटक करत होता. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि विनयभंग केला असं या महिलेने म्हटलं आहे. याच प्रकरणात वरुणला दोषी ठरवण्यात आलं आहे.
७ मे रोजी वरुणला शिक्षा सुनावली जाणार, कोर्टाची माहिती
पीडित महिलेने विमानातून उतरताना वरुणचा फोटो काढला आणि त्यासंदर्भातली तक्रार अमेरिकन एअरलाइन्सकडे केली. वरुणबाबत एअरलाइन्सने माहिती घेतली तेव्हा समजलं की पीडित महिला आणि वरुण दोघंही शेजारी बसले होते. पीडितेने घेतलेला फोटो आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली चौकशी या सगळ्यानंतर वरुणला पोलिसांनी २०२५ मध्ये अटक केली. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने या प्रकरणी वरुणला दोषी ठरवलं आहे आणि त्याला ७ मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

