scorecardresearch

Premium

घमेंडखोरांना जनतेचा पाठिंबा नाही! पंतप्रधान मोदी यांचा ‘इंडिया’ आघाडीवर हल्ला

हिंदी पट्टय़ातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले.

Prime Minister Modi criticism of the India front says that the arrogant people do not have the support of the people
(भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

हिंदी पट्टय़ातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. घमेंडखोर विरोधक एका व्यासपीठावर एकत्र आले तर त्यांचे एकत्रित छायाचित्र चांगले निघेल, पण ते लोकांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, असा टोला मोदी यांनी लगावला.

Prime Minister Narendra Modi expressed confidence about the upcoming Lok Sabha elections
आयेगा तो मोदीही! पंतप्रधानांना विश्वास; परदेशांतून जुलै-ऑगस्टमधील आमंत्रणे आल्याचा दावा
Jharkhand Chief Minister Champai Soren claim on the displeasure of Congress mla
सरकारला धोका नाही! काँग्रेस आमदारांच्या नाराजीच्या चर्चेवर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
Eknath Shinde with Gangster
कुख्यात गुंडांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो, गुन्हेगारांचे मंत्रालयात रील्स, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारची पहिली प्रतिक्रिया
narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे

राजधानीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की विधानसभा निवडणुकांचा निकाल काँग्रेससाठीच नाही तर त्यांच्या आघाडीतील घमेंडखोर पक्षांसाठीही धडा देणारा आहे. घराणेशाही चालवणारे काही पक्ष एका व्यासपीठावर एकत्र आले तर त्यांचे छायाचित्र चांगले निघेल, पण ते देशाचा विश्वास मिळवू शकत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.देशाचे हृदय जिंकण्यासाठी देशाची सेवा करण्याची इच्छा तुमच्याकडे आहे, असे दर्शवावे लागेल, परंतु या घमेंडखोर आघाडीतील भागीदार तसे करण्याची इच्छा दाखवत नाहीत, असा हल्ला मोदी यांनी केला. विरोधकांच्या आघाडीतील भागीदार माध्यमांना ‘हेडलाईन्स’ पुरवण्यासाठी वाईट टिप्पण्या करण्यात आणि नकारात्मकतेत व्यग्र राहतात, परंतु यातून लोकांची मने जिंकता येत नाहीत, असे मोदी म्हणाले. 

हेही वाचा >>>तेलंगणचा काँग्रेसला ‘हात’; बीआरएसची हॅट्ट्रिक हुकली

निकालांचा संदर्भ देऊन मोदी यांनी ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की निवडणुकांचे निकाल असे सांगतात की या आघाडीतील पक्षांना भ्रष्टाचाऱ्यांशी हातमिळवणी करताना लाज वाटलेली नाही. भ्रष्टाचाऱ्यात गुंतलेल्या लोकांशी हातमिळवणी करताना शरम सोडलेल्या या पक्षांना हा निकाल म्हणजे एक धडा आहे. भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या आणि तपास यंत्रणांबद्दल सतत टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की या निकालातून लोकांनी भ्रष्टाचाराविरोधातील लढय़ाला पाठिंबा दर्शवला आहे.काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील पक्षांनी विकास आणि कल्याणकारी योजनांच्या आड येऊ नये, असा इशाराही पंतप्रधान मोदी यांनी दिला.

विरोधकांच्या आघाडीतील पक्ष माध्यमांना ‘हेडलाईन्स’ पुरवण्यासाठी नकारात्मकतेत व्यग्र राहतात, परंतु यातून लोकांची मने जिंकता येत नाहीत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prime minister modi criticism of the india front says that the arrogant people do not have the support of the people amy

First published on: 04-12-2023 at 07:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×