पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत, राज्याच्या विकासासाठी दोन्हीकडे एकाच विचाराचे सरकार गरजेचे असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेच्या लाभार्थींशी शनिवारी संवाद साधला.

गोव्यातील राजकीय वातावरण तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या संवादात ‘डबल इंजिन’ सरकारला उल्लेख केला. स्वयंपूर्ण गोव्याच्या माध्यमातून जनतेचा सर्वांगीण विकास होईल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा केवळ एक उपक्रम नसून, पुढील २५ वर्षांसाठी दूरदृष्टीतून आखलेली ती योजना असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वगुणांचे त्यांनी कौतुक केले.

करत राज्यात सध्याप्रमाणे स्थिर सरकारची गरज असल्याचे स्पष्ट केले. जनतेच्या आशीर्वादाने गोवा आम्ही स्वयंपूर्ण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गोव्यात शंभर टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आगामी काळात पर्यटनात वाढ होईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

प्रमोद सावंत या कार्यक्रमात पंतप्रधानांचे स्वागत केले. गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना सुरू झाली. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट यामध्ये आहे.