पीटीआय, बैतूल (गोवा)

देशातील विविध ऊर्जा स्त्रोतांमध्ये वायू इंधनाचे प्रमाण वाढवण्याचा उद्देश आहे. त्यासाठी येत्या पाच-सहा वर्षांत या क्षेत्रात ६७ अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली.

Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र
Exam of six lakh illiterates
राज्यात सहा लाख निरक्षरांची रविवारी परीक्षा

येथे भारत ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले, की, भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे आणि देश लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या वृद्धीचा एक भाग बनण्यासाठी मोदींनी जागतिक स्तरावरील कंपन्यांना आवाहन करून मोदी म्हणाले, की देशाची इंधन शुद्धीकरण क्षमता २०३० पर्यंत दरवर्षी २५४ दशलक्ष टनांवरून ४५० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>>भारत-म्यानमारच्या सीमेवर बांधणार तब्बल १६०० किमीचं कुंपण, मोदी सरकारचा निर्णय

पायाभूत सुविधांवर सरकारच्या भर असल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, २०२४-२५ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी केलेल्या ११ लाख कोटींच्या तरतुदीचा मोठा हिस्सा ऊर्जा क्षेत्रासाठी वापरला जाईल. रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाई मार्ग किंवा गृहनिर्माण इत्यादींच्या बांधकामात ऊर्जा आवश्यक आहे, त्यासाठी त्याचा विनियोग करण्यात येईल. त्यामुळे भारताची ऊर्जा क्षमतावृद्धीच्या प्रयत्नांना चालना मिळेल.

मोदी म्हणाले, की सरकारच्या सुधारणांमुळे देशांतर्गत वायू इंधनाचे उत्पादन वाढत आहे. विविध ऊर्जा स्रोतांमधील वायू इंधनाचा वाटा सध्याच्या सहा टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी देश प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी आयएमएफचा संदर्भ दिला.