काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आल्यानंतर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे हे आणखी एक उदाहरण असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे हिंसाचाराच्या भीतीने काश्मिरी पंडित खोऱ्यातून स्थलांतर करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

“जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने नियुक्त केलेले लेफ्टनंट गव्हर्नर आणि येथील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. काश्मीर खोऱ्यातून कलम ३७० हटवण्याचा कोणताही फायदा झालेला नाही’ असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.

deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

शोपियन येथे सफरचंदाच्या बागेत आज दहशतवाद्यांकडून दोन भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भावाचा मृत्यू झाला, तर एक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुनील कुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुनील कुमारच्या मृत्यूवर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “शोपियनमध्ये झालेल्या हल्ल्याची वेदना शब्दांपलीकडची आहे. या कठिण काळात मी सुनील कुमारच्या कुटुंबीयांसोबत आहे. हल्ल्यात जखमी युवकाची प्रकृती सुधारण्यासाठी मी प्रार्थना करतो. या हल्ल्याचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे. या रानटी कृत्याला जबाबदार हल्लेखोरांना सोडले जाणार नाही”, असे ट्वीट सिन्हा यांनी केले आहे.

काश्मिरात पाकिस्तानला रक्तपात घडवायचा आहे. पाकिस्तानी दहशतवादी काश्मिरी लोकांचे शत्रू आहेत, अशी टीका या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी केली आहे. या हल्ल्याचा भाजपा प्रवक्ते अल्ताफ ठाकुर यांनी देखील निषेध केला आहे. दहशतवाद्यांना धर्म नसतो. हल्लेखोराला शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना ठाकुर यांनी व्यक्त केली आहे.

ITBP च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला काश्मीरमध्ये अपघात; ६ जवान शहीद

काश्मीर खोऱ्यात गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण वाढले आहे. रविवारी नौहट्टा परिसरात एका पोलिसाची हत्या करण्यात आली होती. तर गेल्या आठवड्यात बांदीपोरामध्ये स्थलांतरीत मजुराला ठार मारण्यात आले होते. सोमवारी बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात दोन ग्रेनेड हल्ले देखील करण्यात आले.