World’s Highest Railway Bridge : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचं आज (६ जून) उद्घाटन केलं आहे. हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळे भारताच्या विकासातील एक महत्वाचा क्षण मानला जात आहे. खरं तर चिनाब नदीवर या पुलाचं बांधकाम करणं हे सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं. मात्र, हे आव्हान पूर्ण करत काही महिन्यांपूर्वी या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

हा चिनाब पूल पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे. खरं तर जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा चिनाब पूलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आज या चिनाब पुलाचं सर्व बांधकाम यशस्वीरित्या पार पडत आणि सर्व चाचण्या यशस्वीरित्या पार करत हा पूल पूर्ण झाला असून आज या पुलाचं उद्घाटन झालं आहे. आता हा पूल खुला होणार आहे. या पुलाला पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन दशकांहून अधिकचा कालावधी लागल्याचं सांगितलं जात आहे.

जम्मू-काश्मीरमधील हा चिनाब पूल भारताच्या पायाभूत सुविधांच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी हा चिनाब पूल महत्वाचा टप्पा मानला जात आहे. आज या पुलाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या संपूर्ण पुलाची पाहणी केली आहे. चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर आता कटरा ते संगलदान दरम्यान ६३ किमीच्या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

दरम्यान, चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक महत्वाचा भाग मानला जात आहे. या पुलाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास हा चिनाब पूल जगातील सर्वात उंच पूल आहे. तसेच हा पूल आयफेल टॉवर टॉवरपेक्षा पूल उंच असून या पुलाच्या बांधकामासाठी २२ वर्ष लागले आहेत. तसेच या चिनाब पुलासाठी १५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जातं.