वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांच्यात हिंद- प्रशांत क्षेत्रातील स्थिती व द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरही उभय नेत्यांनी चर्चा केली.

mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

क्वाड शिखर बैठकीपूर्वी दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. द्विपक्षीय सुरक्षा व संरक्षण सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला असून संरक्षण साहित्य व तंत्रज्ञान यात सहकार्य असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारत व जपान यांच्या विशेष सामरिक संबंधात तसेच जागतिक भागीदारीत जे बदल झाले आहेत त्याबाबत सुगा यांना मोदी यांनी  धन्यवाद दिले.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, जागतिक व प्रादेशिक घडामोडी, अफगाणिस्तानमधील सत्ताबदल यावर चर्चा केली. हिंद- प्रशांत क्षेत्र हे सर्वसमावेशक, मुक्त व खुले असले पाहिजे यावर त्यांच्यात मतैक्य झाले.

दोन्ही पंतप्रधानांनी भारत व जपान यांच्यातील आर्थिक व्यवहार वाढत असल्याचे स्वागत केले. जपान हा भारताचा महत्त्वाचा भागीदार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे. पंतप्रधान सुगा यांच्याशी झालेली बैठक दोन्ही देशातील सहकार्याच्या दृष्टिकोनातून लाभदायी ठरली असे त्यांनी स्पष्ट केले.  दोन्ही देशातील संबंधात आणखी प्रगती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.