या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील गुंतवणुकीबाबत चाचपणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेतील वेगवेगळ्या पाच प्रमुख क्षेत्रांतील आघाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि भारतातील आर्थिक संधीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी बुधवारी अमेरिकेत दाखल झाले. त्यांनी गुरुवारी क्वालकॉम, अ‍ॅडॉब, फर्स्ट सोलर, जनरल अ‍ॅटोमिक्स आणि ब्लॅकस्टोन या पाच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेतली. क्वॉलकॉमचे ख्रिस्टीनो इ अ‍ॅमॉन, ‘अ‍ॅडॉब’चे शंतनु नारायण, फस्र्ट सोलरचे मार्क विडमर, ब्लॅकस्टोनचे स्टीफन ए श्वार्झमन आणि ‘जनरल अ‍ॅटोमिक्स’चे विवेक लाल यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली. त्यापैकी नारायण आणि लाल हे दोघे भारतीय वंशाचे आहेत.

माहिती-तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी ‘अ‍ॅडॉब’चे नारायण यांच्याशी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. ‘जनरल अ‍ॅटोमिक्स’चे लाल यांच्याशी झालेल्या मोदी यांच्या भेटही तेवढीच तोलामोलाची आहे. कारण जनरल अ‍ॅटोमिक्स ही कंपनी केवळ लष्करी ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील आद्य कंपनी नाही, तर जगातील अत्याधुनिक लष्करी ड्रोनही ही कंपनी तयार करते. हे तंत्रज्ञान  अमेरिका केवळ त्याच्या प्रमुख सहकारी व भागीदार देशांना देते.

बायडेन यांची प्रथमच भेट या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबरोबर प्रथमच प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. मूळ भारतीय समुदायाची जगभरात

स्वत:ची वेगळी ओळख…

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी बळकट करण्यासाठी वॉशिंग्टनला पोहचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील भारतीय समुदायाने उत्साहाने स्वागत केले. मूळ भारतीय समुदायाने जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगून मोदी यांनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. मोदी म्हणाले, ‘वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय समुदायाने केलेल्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमचा हा समुदाय आमची ताकद आहे. मूळ भारतीय समुदायाने जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून ही स्तुत्य बाब आहे.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi meeting with the chief executive officer of the front financial opportunity akp
First published on: 24-09-2021 at 02:01 IST