New Parliament Building Inauguration by PM Modi: देशाच्या नव्या संसद भवनाचं येत्या रविवारी अर्थात २८ मे रोजी उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात सध्या अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आधी उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात न आल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर आता नव्या संसद भवनात ठेवण्यात येणाऱ्या ‘सेंगोल’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटनाकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष असताना या नव्या संसद भवनाचा व्हिडीओ समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये संसदेच्या प्रवेशद्वारापासून ते लोकसभा आणि राज्यसभेच्या आतील दृश्यांचा समावेश आहे. संसद भवनावर बसवण्यात आलेला अशोकस्तंभ या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याशिवाय संसदेच्या इमारच्या भव्य प्रवेशद्वारावर लिहिण्यात आलेलं ‘सत्यमेव जयते’ही ठळकपणे समोर येत आहे. लोकसभेच्या आतील दृश्यांचा या व्हिडीओत समावेश करण्यात आला आहे. तब्बल ८८८ सदस्य बसण्याची क्षमता असणारं हे भव्य सभागृह आहे. आधीच्या लोकसभेतील फक्त हिरव्या रंगाचं कारपेट न ठेवता त्या कारपेटवर नक्षीकाम असल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.

pm narendra modi latest ani interview
पुढची निवडणूक ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले…
fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा
PM narendra Modi and Rahul Gandhi
राहुल गांधींच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “चुन चुनके…”

राजदंडावरून वाद तीव्र!

लोकसभेप्रमाणेच राज्यसभेचीही रचना असून याची सदस्य बसण्याची क्षमता ३०० इतकी आहे. या सभागृहातही आधीच्या राज्यसभेप्रमाणे फक्त लाल रंगाचं कारपेट न टाकता नक्षीकाम असणारं कारपेट टाकण्यात आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष आणि सभापतींच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यासिवाय आसन व्यवस्थाही सुसज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

वाद काय?

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्यावरच विरोधकांनी आक्षेप घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांना डावलून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याचवेळी सत्ताधारी भाजपाकडून याआधी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या सरकारांकडूनही अशाच प्रकारे राज्यपालांना डावलून त्या त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांनी उद्धाटनं केल्याचे दाखले दिले जात आहेत. त्यापाठोपाठ संसदेत ठेवण्यात येणाऱ्या सेंगोलवरून वाद निर्माण झाला असून त्यावरून भाजपानं विरोधकांना लक्ष्य केलं आहे.