पंतप्रधान जाणार दंगलग्रस्त मुझफ्फरनगरच्या दौ-यावर

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे सोमवारी उत्तर प्रदेशमधील दंगलग्रस्त मुजफ्फरनगरचा दौरा करणार आहेत

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे सोमवारी उत्तर प्रदेशमधील दंगलग्रस्त मुजफ्फरनगरचा दौरा करणार आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण जातीय दंगलीचा आढावा घेण्यासाठी  हा दौरा आखण्यात आला आहे. यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधीही असण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव यांनी अद्याप दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. या दंगलीला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
जवळपास 47 जणांचा बळी घेणाऱ्या या दंगलीबाबत आणि दंगल शमवण्याबाबत उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या उपाय योजनांबाबत पंतप्रधान हे  मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा करणार आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींचीही ते विचारपूस करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prime minister to visit muzaffarnagar on monday