ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स करोना पॉझिटिव्ह; राजघराण्यापर्यंत पोहचला संसर्ग

ब्रिटीश राजघराण्याने काही दिवसांपूर्वीच हस्तांदोलन टाळण्याचा सल्ला दिला होता

प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आता शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशात आता राजघराण्यातही या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. इंग्लंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढली. ज्यामुळे लोकांच्या भेटीगाठी घेताना हस्तांदोलन करु नका असं राजघराण्यातून सांगण्यात आलं होतं. आता प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. ट्विटरवर तर #Prince Charles हा ट्रेंडही झाला आहे. यामध्ये अवघ्या काही वेळातच ७० हजाराहून अधिक ट्विट पडले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी प्रिन्स चार्ल्स यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली आहे. तर अनेकांनी डायना यांच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल असं म्हणत या बातमीची खिल्लीही उडवली आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prince charles heir to british throne tests positive for coronavirus scj