उत्तर प्रदेशमधील एका सरकारी शाळेमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर नागरीकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुल्लक कारणामुळे मारहाण

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील माहुंगू खेडा शाळेत हा प्रकार घडला आहे. महिला शिक्षिकेला शाळेमध्ये यायला १० मिनिट उशीर झाला. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने त्या शिक्षिकेला चपलेने मारहाण केली. व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेला जोरजोरात मारताना दिसत आहे. यावेळी शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थीही उपस्थिती होते.

मुख्याध्यापक निलंबित
घटनेनंतर मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मूलभूत शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी दिली आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी मुख्याध्यापकांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन करण्यात आले तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Principal beaten female teacher by shoes in uttar pradesh school dpj
First published on: 26-06-2022 at 11:41 IST