scorecardresearch

‘हाय रिस्क’ देशांमधून येणाऱ्यांसाठी नवा नियम; RT-PCR चाचणीसाठी आता करावी लागणार पूर्वनोंदणी

पहिल्या टप्प्यात हे नियम दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू आणि हैद्राबाद या शहरांमधील विमानतळांवर लावले जातील.

(संग्रहित छायाचित्र)

ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ‘हाय रिस्क’ देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांच्या RT-PCR चाचणीसाठी पूर्व नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांनी त्यांच्या चाचण्यांची आधीच नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या विमानामध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. अशा प्रवाशांच्या चाचण्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांची असेल.

ब्रिटननेही अशाच प्रकारची नियमावली लागू केली आहे. त्यानुसार देशात येणार्‍या सर्व प्रवाशांनी RT-PCR चाचण्यांसाठी अगोदर बुकिंग करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झालेल्या कोणालाही ब्रिटीश विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी नाही.

हेही वाचा – सावध…ऐका पुढल्या हाका! ब्रिटनमध्ये Omicron चा पहिला बळी; पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची माहिती

भारतात, हा नियम २० डिसेंबरपासून लागू होईल. पहिल्या टप्प्यात, तो फक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू होईल.

नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना ‘हाय रिस्क’ देशांमधून येत असल्यास किंवा गेल्या १४ दिवसांत ‘हाय रिस्क’ देशांना भेट दिलेली असल्यास प्रवाशांना RT-PCR चाचण्यांसाठी अनिवार्यपणे पूर्वनोंदणी करण्याची परवानगी देण्यासाठी एअर सुविधा पोर्टलमध्ये बदल केले जातील. ही प्रणाली सुरळीत चालत आहे की नाही, पूर्वनोंदणी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही ना, चाचण्यांसाठीचा खर्च याची खात्री करण्यासाठी पहिल्या टप्प्यात हे नियम दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू आणि हैद्राबाद या शहरांमधील विमानतळांवर लावले जातील.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prior booking of rt pcr tests must at risk countries covid omicron vsk