पीटीआय, देहरादून

जोशीमठची जमीन खचून घरांना तडे जात असल्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी या भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. धामी यांनी लोकांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे.

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

गुरुवारपासून तेथे तळ देऊन असलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाशीही धामी यांनी चर्चा केली. या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात असून या कामाची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

जोशीमठमधील नागरी वसाहतींच्या अरुंद रस्त्यांवरून जात धामी यांनी तडे गेलेल्या घरांची आत जाऊन पाहणी केली. धोकादायक भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सरकारचे प्रथम प्राधान्य आहे, असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले. भूस्खलनाचा धोका लक्षात घेता या भागासाठी दीर्घकालीन उपाययोजना, पुनर्वसन धोरण ठरविण्याबाबत विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी येथील प्रसिद्ध नरसिंह मंदिरातही लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.

निसर्गाविरुद्ध गेल्याचा परिणाम : राहुल गांधी</strong>
नवी दिल्ली : जोशीमठमध्ये घरांना तडे गेल्याने नागरिकांवर ओढवलेल्या संकटाबाबत काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारने सध्याच्या थंडीच्या दिवसांत या हे लोक सुरक्षित राहतील, याची तजवीज करावी, अशी मागणी केली आहे. राहुल यांनी फेसबुकवरील संदेशात म्हटले आहे की, जोशीमठमधील दृश्ये भयावह आहेत. निसर्गाच्या विरोधात जात सातत्याने केलेले उत्खनन आणि डोंगररांगांत कोणत्याही नियोजनाशिवाय केलेली बांधकामे यामुळे हे संकट उद्भवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जोशीमठ हे सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्टय़ाही महत्त्वाचे स्थान आहे. हे ठिकाण वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. – पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड