भावाची जागाही वाचवू शकल्या नाहीत प्रियंका गांधी, जिथे प्रचार केला त्या सर्व ठिकाणी पराभव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं ट्रम्प कार्ड समजला जाणारा ‘प्रियंका गांधी फॅक्टर’ पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं ट्रम्प कार्ड समजला जाणारा ‘प्रियंका गांधी फॅक्टर’ पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. काँग्रेसने सोनिया गांधी यांची रायबरेली आणि राहुल गांधी यांची वायनाड येथील जागा वगळता प्रियंका गांधींनी जिथे प्रचार केला त्या सर्व जागा गमावल्या आहेत. इतकंच नाही तर पंजाबमध्ये प्रियंका गांधींनी ज्या दोन ठिकाणी भटिंडा आणि गुरदासपूर येथे प्रचार केला त्या मतदारसंघातही काँग्रेसचा पराभव झाला. पंजाबमध्ये काँग्रेसने १३ पैकी आठ जागा जिंकल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka gandhi factor flopped in lok sabha election