प्रियंका गांधींची अमित शाहांवर टीका; म्हणाल्या, “केंद्रीय गृहमंत्री दागिने घालून निघण्याचा….”

प्रियंका गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

amit - priyanka
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. नेत्यांच्या उत्तर प्रदेशमधील भेटी वाढल्या असून काँग्रेस, भाजपासह इतर पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. यातच काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील काही गुन्ह्यांच्या घटनांवरून निशाणा साधला आहे. अमित शाह ‘दागिने घालून निघण्याचा जुमला’ देतात, पण हे फक्त राज्यातील महिलांनाच माहीत आहे की त्यांना त्यांना दररोज कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

प्रियंका गांधी य़ांनी ट्विटर केले की, “देशाचे गृहमंत्री दागिने घालून निघण्याचा जुमला देतात, परंतु रोज कोणत्या प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे फक्त यूपीच्या महिलांनाच माहीत आहे. म्हणूनच ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकते’ हे या राज्यात आवश्यक आहे. जेणेकरून महिलांचा राजकारणात आणि सुरक्षेशी संबंधित धोरणे बनवण्यात सहभाग वाढेल.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, आज १६ वर्षांची मुलगी देखील रात्री १२ वाजता दागिने घेऊन यूपीच्या रस्त्यावरून फिरू शकते, एवढं हे राज्य सुरक्षित आहे. शाह यांच्या याच वक्तव्यावरून प्रियंका गांधी यांनी टोला लगावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priyanka gandhi targeted amit shah over his remark on woman safety in up hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या