प्रियांका गांधींचा फिल्मी अंदाज, ‘दीवार’ चित्रपटातला डायलॉग मारून म्हणाल्या; “मेरे पास…!”

प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना फिल्मी स्टाईलमध्ये दीवार सिनेमातला डायलॉग बोलून दाखवला आहे.

priyanka gandhi yogi adityanath uttar pradesh election
प्रियांका गांधी यांनी दीवार सिनेमातला डायलॉग मारत भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

त्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांच्या विजयासाठी निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसनं देखील उत्तर प्रदेशसारखं राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं राज्य आपल्या ताब्यात घेऊन भाजपाला धक्का देऊन २०२४ च्या मैदान तयार करण्यावर जोर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंना दिग्गज नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. प्रचारासाठी देखील नवनवीन क्लृप्त्या आणि घोषणा केल्या जात आहेत. त्यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा फिल्मी अंदाज या प्रचारादरम्यान दिसून आला आहे.

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये न्यूज १८ नं प्रियांका गांधींची घेतलेली प्रतिक्रिया दिसत आहे. त्यामध्ये प्रियांका गांधी १९७५ सालचा शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दीवार चित्रपटातला एक संवाद बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये पत्रकाराने विरोधकांच्या टीकेविषयी प्रियांका गांधींना सांगितलं. काँग्रेसकडे कोणताही बेस नसल्यामुळेच प्रियांका गांधींनी महिलांविषयी बोलायला सुरुवात केल्याची विरोधकांकडून टीका केली जात असल्याचं प्रियांका गांधींना सांगताच त्यांनी त्यावर हसत प्रतिक्रिया दिली.

“माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाऊंटही हॅक, सरकारकडे दुसरं काम नाही का?”, प्रियांका गांधींचा हल्लाबोल

“तुम्ही दीवार सिनेमातला तो संवाद ऐकलाय का? अमिताभ बच्चन आणि शशी कपूर भाऊ असतात. अमिताभ बच्चन म्हणतात, मेरे पास गाडी है, बंगला है… त्यावर शशी कपूर म्हणतात मेरे पास माँ है… तर मी म्हणते, मेरे पास बेहेने है”, असं प्रियांका गांधी यावर म्हणाल्या.

हा व्हिडीओ प्रियांका गांधींनी ट्वीट केला असून त्यासोबत “मेरे पास बहनें हैं…बहनें राजनीति में बदलान लाएंगी”, असा संदेश देखील प्रियांका गांधींनी लिहिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka gandhi viral video deewar movie shashi kapoor amitabh bachchan dialogue pmw

Next Story
अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल आणि मुलीस करोनाचा संसर्ग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी