खलिस्तान समर्थक संघटना अडचणीत ; NIA पथक कॅनडात पोहचलं!

परदेशी फंडींगच्या मार्गांचा तपास केला जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शेतकरी आंदोलनादरम्यान बातम्या आल्या होत्या की दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या हिंसाचाराच्या मागे खलिस्तानचा हात होता. ज्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. आता सिख फॉर जस्टीस (एसएफजे) सारख्या खलिस्तानच्या निर्माणाचे समर्थन करणाऱ्या फुटीरतावादी संघटनांद्वारे एनजीओच्या फंडींगची चौकशी करत असलेली राष्ट्रीय तपास यंत्रणेची(एनआयए) टीम आज (शुक्रवार) कॅनडामध्ये दाखल झाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएचे तीन सदस्यीय पथक चार दिवसीय दौऱ्यात या फुटीरतावादी संघटनांच्या परदेशी संस्थांसोबतच्या संबंधांचा तपास करेल. या पथकाचे नेतृत्व आयजी स्तरावरील अधिकारी करत आहे.

एनआयएच्या रडारावरील संघटनांमध्ये एसएफजे, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खालिस्तान जिंदाबाद फोर्स आणि खलिस्तान टायगर फोर्सचा समावेश आहे. कॅनडा, यूके, यूएसए, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीमधून त्यांच्या परदेशी फंडींगच्या मार्गांचा तपास केला जाईल.

या वर्षाच्या सुरूवातीला दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी एसएफजेने प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडवणाऱ्यासाठी अडीच लाख रुपये अमेरिकन डॉलरची घोषणा केली होती.एसएफजेचा दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने एका व्हिडिओत शेतकऱ्यांच्या विरोधास १९८४ च्या शीख विरोधी दंगलीशी जोडण्याचा प्रयत्नह केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro khalistan organizations in trouble the nia team arrived in canada msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य