उत्तर प्रदेशातील महिलांच्या समस्या शहा यांना ठाऊक नसाव्यात- प्रियंका

राज्यातील महिलांना रोज कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे गृहमंत्र्यांना ठाऊक नसावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

amit - priyanka
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोळा वर्षांची मुलगी दागिने घालून मध्यरात्रीही रस्त्यावरून फिरू शकते, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी टीका केली असून हा केवळ जुमला असल्याचे म्हटले आहे.

   राज्यातील महिलांना रोज कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे गृहमंत्र्यांना ठाऊक नसावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी  काही बातम्या ट्विटरवर टाकल्या असून कानपूरमध्ये तीन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीस गेल्याचे म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित असल्याचा दावा केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Problems of women in uttar pradesh congress general secretary priyanka gandhi vadra union home minister amit shah akp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या