शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन, हरयाणाच्या वैज्ञानिकाची कमाल

हरयाणामधील रोहतक जिल्ह्यातील मदिना गावात राहणारे डॉ. शिवदर्शन मलिक यांनी गेल्या ६ वर्षांपासून शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन करत आहेत.

Produces cement, bricks and paints from Haryana's scientific dung
शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन (photo indian express)

हरयाणामधील रोहतक जिल्ह्यातील मदिना गावात राहणारे डॉ. शिवदर्शन मलिक यांनी गेल्या ६ वर्षांपासून शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन करत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. डॉ. शिवदर्शन मलिक यांनी रसायनशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या गावात ‘गोबर गॅस प्लांट’ स्थापन झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शेण एकतर वाया जाते किंवा फक्त गवऱ्या तयार करण्यासाठीच वापरले जाते.

गावात गवऱ्यापेक्षा ‘गोबर गॅस’चा उपयोग जास्त आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत शेणाच्या वापराचे प्रमाण कमी झाले आहे. एका अंदाजानुसार भारतात दररोज ३३ ते ४० दशलक्ष टन शेण उत्पादन होते. डॉ. शिवदर्शन मलिक यांनी शेणाच्या संशोधन केले तेव्हा असे आढळले की, ही थर्मली उष्णतारोधक सामग्री आहे जी हिवाळ्यात घरे उबदार आणि उन्हाळ्यात थंड करण्यासाठी वापरली जाऊ शकते. भारतात शतकानुशतके कोटिंग्जसाठी माती आणि शेणाचे मिश्रण वापरले जाते. आजही खेड्यांमध्ये घराला शेणाचा लेप लावल्या जाते.

पर्यावरणपूरक घरे बनविण्याच्या केला पद्धतींचा अभ्यास

रोहतक येथील महाविद्यालयात काही महिने प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर डॉ. शिवदर्शन मलिक २००४ मध्ये आयआयटी दिल्ली आणि जागतिक बँकेने प्रायोजित केलेल्या नूतनीकरणयोग्य उर्जा प्रकल्पात सामील झाले. २००५ मध्ये त्यांनी यूएनडीपी प्रकल्पात काम केले. त्यादरम्यान, त्यांना अमेरिका आणि इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली जिथे त्यांनी पर्यावरणपूरक घरे बनविण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला.

शेणापासून तीन प्रकारच्या विटा करतात तयार

भारतात परत आल्यावर त्यांनी शेणाविषयी सखोल अभ्यास सुरू केला आणि २०१५-१६ मध्ये त्यांनी ‘वैदिक प्लास्टर’ नावाने शेण, जिप्सम, ग्वारगम, माती आणि निंबू पावडर पासून सीमेंट तयार केले. त्यानंतर त्यांनी राजस्थानच्या बीकानेरमध्ये शेणापासून वीट बनवण्याचे एक युनिट स्थापित केले गेले ज्यामध्ये १५ लोक काम करतात. बीकानेरमध्येच शेणापासून बनवलेल्या विविध गोष्टींवर तीन दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाते. डॉ. शिवदर्शन मलिक शेणापासून तीन प्रकारच्या विटा तयार करतात. या विटा भट्टीत भाजल्या जात नाहीत किंवा त्यामध्ये पाणी वापरत नाही. सिमेंट आणि विटा बनवल्यानंतर डॉ. मलिक यांनी सन २०१९ मध्ये शेणापासून पेंट बनविण्यातही यश मिळवले.

हेही वाचा – इंधनदरवाढ हे केंद्र सरकारचं अपयश; मोदींचं ९ वर्षांपूर्वीचं ते ट्विट पुन्हा चर्चेत

डॉ. मलिक यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड इत्यादी राज्यांमधील १०० हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. हे प्रशिक्षित लोक आता देशाच्या कित्येक भागात शेणापासून विटा आणि सिमेंट बनवून आपले जीवन जगतात. डॉ. मलिक यांच्या दाव्यानुसार, एकदा माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी या तंत्राची प्रशंसा करून त्यांना खूप प्रोत्साहन दिले. डॉ. मलिक यांना हरियाणा कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Produces cement bricks and paints from haryana scientific dung srk