संयुक्त राष्ट्रे : राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेतील निवडणुकीत त्यांना हे यश मिळाले आहे.

  संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस तिरूमूर्ती यांनी प्रा. बिमल पटेल यांचे अभिनंदन केले असून त्यांना या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पटेल (वय ५१) यांना १९२ सदस्य देशांपैकी १६३ मते मिळाली. त्यात त्यांनी आशिया- पॅसिफक गटातील चीन, दक्षिण कोरिया व  जपान या देशांवर मात केली आहे. प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड झाली असून आमचे या संस्थेतील योगदान व आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचे प्रयत्न महत्त्वाचे राहतील असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. चीनच्या दंडेलीविरोधात अप्रत्यक्षपणे भारताने आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचा इरादा व्यक्त करून इशारा दिला आहे. ज्या देशांनी भारताला मतदान केले त्यांचे दूतावासाने आभार मानले आहेत. भारताचे पटेल यांना १६३ मते मिळाली. थायलंडला १६२, जपानला १५४, व्हिएतनामला १४५ मते मिळाली आहेत. चीनला १४२ मतांवर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाला १४०, सायप्रसला १३९ तर मंगोलियाला १२३ मते मिळाली.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
ncp spokesperson anand paranjape marathi news, anand paranjape criticize mahavikas aghadi marathi news
“निवडणुकीआधीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला”, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची टीका
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार