पीटीआय, नवी दिल्ली : प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज, प्रतिमा, नाव अथवा त्यांच्या खास वैशिष्टय़ांचा अनधिकृत वापर करण्यास संबंधितांना प्रतिबंध करण्याचा अंतरिम आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. लोकप्रिय असल्याने आपल्या प्रसिद्धीविषयक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची याचिका अमिताभ बच्चन यांच्यातर्फे दाखल करण्यात आली होती. ‘केबीसी लॉटरी’ चालकांसह अनेकांना हा प्रतिबंधित आदेश लागू केला गेला आहे. अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी मार्चमध्ये होणार आहे.

न्यायमूर्ती नवीन चावला म्हणाले, की बच्चन हे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत यात शंका नाही आणि या टप्प्यावर त्यांना दिलासा न मिळाल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान आणि बदनामी होऊ शकते. त्यांनी पूर्वपक्षीय अंतरिम दिलासा मिळविण्यासाठी प्रथमदर्शनी पुरेसा युक्तिवाद केला आहे. न्यायालयाने नमूद केले, की हा एकपक्षीय अंतरिम आदेश लागू करण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या परवानगीविना प्रतिवादी आपल्या व्यावसायिक उपक्रमांच्या प्रचारासाठी बच्चन यांच्या प्रतिमेचा सोयीस्कर वापर करत आहे. त्यामुळे बच्चन यांची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. त्यांची अप्रतिष्ठा होण्याचा धोका आहे. तसेच त्यांनी ज्या उपक्रमांविषयी तक्रार केली आहे, त्याद्वारे त्यांची बदनामीही होऊ शकते. न्यायालयाने बच्चन यांच्या परवानगीविना त्यांचे नाव-छबी-प्रतिमेचा वापर केला जातो, अशा संकेतस्थळांवर कारवाईचे आदेश दूरसंचार अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकांनाही प्रतिबंधित करण्याचे निर्देश दूरसंचार सेवेला न्यायालयाने दिले.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

लॉटरी, टीशर्ट, प्रश्नमंजुषा आदींसाठी विनापरवानगी वापर 

बच्चन यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी सांगितले, की या खटल्यात ज्यांची नावे आहेत त्यांच्यासह अमिताभ बच्चन यांच्या नावाचा अनधिकृत वापर करणाऱ्या असंख्य अज्ञात संस्था-व्यक्तींनाही हा प्रतिबंध लागू असेल. लॉटरीशिवाय अनेक व्यावसायिक उपक्रमांत अमिताभ यांच्या नावाचा अनधिकृत वापर होत आहे. त्यांची प्रतिमा असलेल्या टीशर्टची विक्री होत आहे. वकील अमित नाईक आणि प्रवीण आनंद यांनीही बच्चन यांची बाजू उच्च न्यायालयासमोर मांडली. साळवे यांनी सांगितले, की अमिताभ यांच्या नावाने संकेतस्थळाची नोंदणी झाली आहे. अमिताभ बच्चन दूरदृश्य संपर्क यंत्रणा (व्हीडीओ कॉल) नावाने व्यावसायिक सेवा पुरवली जात आहे. वाहिनीवरील प्रश्नमंजूषेत (क्विझ) सहभागी होणाऱ्या इच्छुकांना अमिताभ यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर असलेले सामान्यज्ञान प्रश्नोत्तरांचे पुस्तकाचीही सर्रास विक्री होत आहे.