scorecardresearch

मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू, शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा दावा

३१ जानेवारीच्या भुवनेश्वरच्या कार्यक्रमात स्वामी निश्चलानंद यांचं वक्तव्य

Swami Nishchalanand
वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे स्वामी निश्चलानंद यांनी?

मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते असा दावा शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी केला आहे. अमेरिकेतल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता की मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे सनातनी हिंदू होते हा मुद्दा उपस्थित केला होता. तेच उदाहरण देऊन स्वामी निश्चलानंद यांनी हा दावा केला आहे. भुवनेश्वरच्या ३१ जानेवारीच्या कार्यक्रमात स्वामी निश्चलानंद यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होते आहे.

सरकारचं मंदिर आणि मठांवर नियंत्रण नको

पुरी येथील शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी म्हटलं आहे की मंदिरं आणि मठांवर सरकारचं नियंत्रण असायला नको. प्रत्येक ठिकाणी विकासकामांसाठी हे पैसे खर्च किंवा हा निधी खर्च करण्याची आवश्यकता नाही असंही वक्तव्य निश्चलानंद यांनी म्हटलं आहे. पुरी येथील रत्नभांडाराची चावी हरवली आहे त्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की ओदिशा सरकार, जगन्नाथ मंदिर प्रशासन यांनी यासंदर्भात कुठलीही चर्चा केलेली नाही. रत्न भांडाराच्या प्रकरणांमध्ये मी हस्तक्षेप करावा का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. द प्रिंटने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Budget 2023 App: केंद्रीय अर्थसंकल्पाचं अधिकृत सरकारी अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स…

३८ वर्षांपूर्वी हरवली पुरी मंदिरातली चावी

जगन्नाथ पुरी येथील मंदिरात सात रत्नभांडार आहेत. यापैकी चार भांडाराच्या चाव्या ३८ वर्षांपूर्वी अचानक हरवल्या आहेत. त्याबाबत आता मी काय भाष्य करू? असा प्रश्न स्वामी निश्चलानंद यांनी विचारला आहे.

Union Budget 2023 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात; करदात्यांसाठी अर्थसंकल्पात दिलासा की चिंता? काय स्वस्त, काय महागणार?

जोशीमठ येथील घटनांबाबत काय म्हणाले निश्चलानंद?

उत्तराखंड येथील जोशीमठ येथे घरं, इमारती आणि रस्ते यांना भेगा पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. जोशीमठ येथील जमीनही खचते आहे. यावर स्वामी निश्चलानंद सरस्वती यांना विचारला असता स्वामी निश्चलानंद म्हणाले की पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणं हे आपलं काम आहे. विकास हा शब्द आणि त्याभोवतीचा संदर्भ हा आपण प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. पृथ्वी, पाणी, हवा हे उर्जेचे स्रोत आहेत. प्रत्येक ठिकाणी विकास करण्याची आवश्यकता नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 10:30 IST