भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झालेली असून आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या वादावर बॉलिवूडमधील खान मंडळींनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. यावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूमधील खानमंडळींनी या वादावर बोललं पाहिजे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते ज्या स्थितीत आहे तिथे सध्या मी नाही. पण मला वाटतं ते अशा स्थितीत आहेत जिथे त्यांच्याकडे गमावण्यासारखं फार आहे. त्यांना यामध्ये फार जोखीम पत्करावी लागू शकते”.

Prophet Row: नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “पंतप्रधानांनी हे विष…”

नसीरुद्दीन शाह आर्यन खानला झालेली अटक आणि नंतर त्याची केलेली निर्दोष मुक्तता यावरही भाष्य केलं. “शाहरुख खानसोबत जे झालं आणि ज्या पद्दतीने तो सामोरं गेला ते वाखाणण्याजोगं होतं. त्याने फक्त तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. सोनू सूदवरही धाड टाकण्यात आली. जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला उत्तर दिलं जात आहे. कदाचित यानंतर माझा क्रमांक असेल. पण त्यांना काही मिळणार नाही,” असं त्यांनी मिश्कीलपणे सांगितलं.

नसीरुद्दीन शाह यांनी यावेळी द्वेषयुक्त चर्चेसाठी वृत्तवाहिन्यांना जबाबदार धरलं. “द्वेष निर्माण केला जात असून जेव्हा तुम्हाला विरोधी दृष्टिकोनाचा सामना करावा लागतो तेव्हा ते विष असतं. टीव्ही न्यूज आणि सोशल मीडिया यासाठी जबाबदार आहे,” असं ते म्हणाले. अनेक वर्षांपासून हा द्वेष तयार होत असल्याचंही ते म्हणाले.

भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नुपूर शर्मांवर कारवाई कशासाठी?; पक्षाचं नेमकं म्हणणं काय?

“या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच धर्मसंसदेत (हरिद्वार) जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी तसं सांगावं आणि नसेल तर तसंही स्पष्ट करावं,” असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना ट्वीटरला फॉलो करत आहेत. त्यांनी काही तरी केलं पाहिजे, त्यांनी हे विष अजून पसरण्यापासून रोखलं पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prophet row naseeruddin shah bjp nupur sharma pm narendra modi bollywood amir khan salman khan shahrukh khan sgy
First published on: 09-06-2022 at 09:56 IST