नवी दिल्ली : ‘ज्ञानवापी-शृंगार गौरी संकुलात सर्वेक्षणादरम्यान कथितरीत्या शिवलिंग सापडलेला भाग संरक्षित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल़े  या मशिदीत मुस्लीम कोणत्याही अडथळय़ाविना नमाज अदा करू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने सर्वेक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी़  एस़  नरसिंह यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली़  ज्ञानवापी—शृंगार गौरी संकुलाचे चित्रीकरणाद्वारे करण्यात आलेले सर्वेक्षण हे प्रार्थनास्थळ कायदा १९९१ मधील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आह़े  दुसरीकडे, हिंदू सेनेने या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करून मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळण्याची मागणी केली़

ज्ञानवापी-शृंगार गौरी संकुलाच्या सर्वेक्षणाबाबत वाराणसी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला़  सर्वेक्षणादरम्यान कथितरीत्या शिवलिंग सापडलेला भाग संरक्षित करण्याचे निर्देश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल़े  मात्र, मशिदीत मुस्लिमांना नमाज अदा करता येईल़  त्यात त्यांना कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल़े या प्रकरणाची सुनावणी १९ मे रोजी होणार आह़े

सर्वेक्षकाला हटविले

वाराणसी न्यायालयाने मंगळवारी या संकुलाचे सर्वेक्षण करणारे अ‍ॅडमिन अजयकुमार मिश्रा यांना पदावरून हटविले. या संकुलाचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मिश्रा यांच्यावर सोपविण्यात आली़  न्यायालयाने सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास समितीला दोन दिवसांची मुदतही दिली़

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protect shivling allow namaz supreme court in gyanvapi case zws
First published on: 18-05-2022 at 00:22 IST