scorecardresearch

Premium

अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’चा नारा, “मोदी खूनी आहेत” म्हणत नागरिकांकडून निषेध

अमेरिकेतील नागरिक पंतप्रधान मोदींविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

protest against pm narendra modi in america
अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत केलं आहे. राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी जो बायडेन यांचे आभार मानले. स्थानिक वेळेनुसार, आज दुपारी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करणार आहेत.

एकीकडे अमेरिकेच्या सरकारकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं असलं तरी अमेरिकेतील नागरिक पंतप्रधान मोदींविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काश्मीरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन, अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले, मानवाधिकार कायद्यांची पायमल्ली आदी प्रश्नांवरून अमेरिकेतील विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोदींविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हातात पोस्टर घेऊन त्यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या नागरिकांनी ‘गो बॅक मोदी’, ‘मोदी नॉट वेलकम’ अशा आशयाचे पोस्टर घेऊन पंतप्रधान मोदींचा निषेध केला आहे.

Joe Biden on Hamas attack on Israel
हमासकडून इस्रायलवर ५ हजार रॉकेट्सचा हल्ला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Kevin McCarthy,Speaker of the House of Representatives , lower house of the US Congress , Kevin McCarthy, Kevin McCarthy has resigned post ,
केविन मॅकार्थी यांची सभापती पदावरून गच्छंती; अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षात गोंधळाची अवस्था
PM-Narendra-Modi-and-Rahul-Gandhi-Speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी; ओबीसींचा खरा कैवारी कोण?
narendra modi and justin trudeau
‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?
“पंतप्रधान मोदींच्या द्वेष आणि लोभाच्या अजेंड्याविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत”
“मोदी हा पूर्वेतील उगवता हिटलर आहे, बायडेन यांनी मोदींच्या फॅसिझमला खतपाणी घालणं थांबवावं”

“मोदी हा पूर्वेतील उगवता हिटलर आहे, बायडेन यांनी मोदींच्या फॅसिझमला खतपाणी घालणं थांबवावं”, “पंतप्रधान मोदी अल्पसंख्यांकांना मारणं थांबवा”, “मोदी हे खूनी आहेत”, “हिंदुत्व हे हिंदूंचं वर्चस्व आहे”, “मोदीजी, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवा, अन्यायकारक शेतकरी कायदे मागे घ्या”, “भारतीय दहशतवादाचा चेहरा मोदी”, असे असंख्य संदेश देणारे पोस्टर्स घेऊन नागरिक अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करत आहेत.

“अडॉल्फ मोदी, नाझी मोदी”
“आम्ही काश्मीरच्या बाजुने उभे आहोत”

“नरेंद्र मोदी आणि त्यांची फॅसिस्ट राजवट भारतातील मानवी हक्कांचे (विशेषत: अल्पसंख्याकांचे) उल्लंघन करत आहे. नरेंद्र मोदी संपूर्ण दक्षिण आशियावर राज्य करण्याच्या ध्येयाने त्यांची हिंदुत्ववादी विचारधारा जगभरात निर्यात करत आहेत. तरीही यूएन आणि न्यूयॉर्कने मोदींना आणि त्यांच्या फॅसिस्ट विचारसरणीला येथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यामुळे मोदी आणि त्यांच्या विचारधारेला विरोध करण्यासाठी एकत्रित व्हा. न्यूयॉर्क मोदींचं आणि त्यांच्या हिंदुत्वाचं समर्थन करत नाही,” अशी हाक अमेरिकेतील विविध संघटनांनी दिली आहे. यामध्ये, ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हींग’ (DRUM), ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या अस्तित्वावर भाष्य केलं आहे. भारतामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या संरक्षणाच्या मुद्यावर चर्चा व्हायला हवी, असे मत बराक ओबामा यांनी व्यक्त केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protest and slogans against pm narendra modi in usa pm modi visit america go back modi is killer rmm

First published on: 23-06-2023 at 00:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×