गेल्या काही महिन्यंपासून देशाच्या राजधानीत अर्थात दिल्लीत देशासाठी अनेक पदकं मिळवून देणारे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम असून पाच दिवसांपूर्वी त्यांनी सरकारला अल्टिमेटम देत आपली सर्व पदकं गंगेत विसर्जित करण्याचा इशारा दिला होता. आज त्यांचा अल्टिमेटम संपत असून त्या पार्श्वभूमीवर आंदोलक कुस्तीपटूंची अमित शाह यांच्याशी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन तास चालली बैठक!

बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह काही प्रशिक्षकांच्या शिष्टमंडळानं काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं “आमची केंद्रीय गृहमंत्र्यांशी बैठक झाली. याहून जास्त माहिती मी देऊ शकत नाही”, अशी माहिती दिली. त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय घडलं? याविषयी तर्क-वितर्क सुरू असून आज अल्टिमेटम संपत असल्यामुळे कुस्तीपटू नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesting wrestlers bajrang punia sakshi malik meets amit shah at midnight pmw
First published on: 05-06-2023 at 08:24 IST