scorecardresearch

Premium

मोदींची पदवी वेबसाईटवर प्रसिद्ध करा, केजरीवाल यांची दिल्ली विद्यापीठाकडे मागणी

मोदी यांच्या पदवीवरून सोशल मीडियावर काही शंका उपस्थित केल्या जात आहेत

arvind kejriwal, narendra modi
आपल्या देशाचे पंतप्रधान किती शिकलेले आहेत, याची माहिती जाणून घेण्याचा देशवासियांना अधिकार आहे, असे केजरीवाल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावे, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांच्याकडे पत्राद्वारे केली. गेल्या काही दिवसांपासून मोदी यांच्या पदवीवरून सोशल मीडियावर काही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
आपल्या देशाचे पंतप्रधान किती शिकलेले आहेत, याची माहिती जाणून घेण्याचा देशवासियांना अधिकार आहे. त्यातही जर पंतप्रधानांच्या पदवीबद्दल शंका उपस्थित करण्यात येत असतील, तर हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे विद्यापीठाने मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रे विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीबद्दल माहिती मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी माहिती अधिकारात अर्जही केला आहे. त्यावर मुख्य माहिती आयुक्तांनी लवकरात लवकर ही माहिती केजरीवाल यांना देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. १९७८ मध्ये मोदींनी दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि १९८३ मध्ये गुजरात विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली अशी माहिती समोर आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-05-2016 at 14:49 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×