Pune Made in Pakistan Label Creates Huge Stir: पुण्यातील एका महिलेने दावा केला की, तिने धार्मिक जत्रेतून खरेदी केलेल्या चादरीवर मेड इन पाकिस्तान असे लेबल होते. सदर कापड धुतल्यानंतर हे लेबल दिसले, असे महिलेने सांगितले. या दाव्यानंतर आता पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. मोरिया गोसावी मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीला आयोजित केलेल्या जत्रेत एका स्टॉलवरून ही चादर खरेदी करण्यात आली होती.
महिलेच्या म्हणण्यानुसार, चादर खरेदी करताना तिला काहीही असामान्य आढळले नाही. मात्र घरी आणल्यानंतर जेव्हा चादर धुतली तेव्हा त्यावर मेड इन पाकिस्तान असे लिहिलेला लेबल आढळला. सदर लेबल दिसल्यामुळे चिंतेत पडलेल्या महिलेने सोशल मीडियावर याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला.
पाकिस्तानात तयार झालेल्या वस्तू महाराष्ट्रातील स्थानिक बाजारात कशा पोहोचल्या? असा प्रश्न या महिलेने व्हिडीओमध्ये उपस्थित केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर वाद निर्माण झाला आणि पोलिसांनीही याची दखल घेतली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लेबल असलेली चादर कुठे उत्पादित करण्यात आली आणि त्याचा जत्रेत पुरवठा आणि विक्री कशी झाली, हे निश्चित करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. अशा उत्पादनांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
This is serious issue how come it's possible @Dev_Fadnavis Ji
— Thomas ???????️✌️ (@Thomas11P) June 5, 2026
Made in Terroisthan product in Pune Pimpri-Chinchwad, Maharashtra that's too Mahasadhu Shree Morya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir.
Need to take action or it's dangerous?
Video credit : Bharati Bhave Tai? pic.twitter.com/049xgy8Rjj
संकष्टी चतुर्थीच्या उत्सवादरम्यान बुधवारी ही चादर खरेदी करण्यात आली होती. जत्रेनिमित्त मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. भाविकांची गर्दी होत असल्यामुळे जत्रेत विविध वस्तूंची विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्येही मेड इन पाकिस्तान वस्तू
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेड इन पाकिस्तान असे लेबल असलेली सौंदर्यप्रसाधने विकण्यात आली होती. या प्रकारानंतर तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्याच्या काही दिवसांनी सदर घटना घडली आहे. मेड इन पाकिस्तान लेबल असलेल्या वस्तूंचा पुरवठा कुणी केला आणि त्यामागे मोठे वितरण जाळे आहे का? याचा तपास आता केला जात आहे.
मदरशात ‘मेड इन पाकिस्तान’ पंखा
उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एका मदरशात काही दिवसांपूर्वी छताला लावलेला पंखा दुरुस्तीला दिल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली होती. या पंख्याच्या मोटरवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिलेले आढळले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. एका धार्मिक आस्थापनेत पाकिस्तानी बनावटीचा पंखा आढळून आल्यामुळे हा विषय चर्चेत आला होता.
कुशीनगर जिल्ह्याचे प्रांत अधिकारी जयंत यादव या प्रकरणी म्हणाले की, पोलिसांनी मदरशाचा व्यवस्थापक युनुस अन्सारीची चौकशी केली. त्यांनी म्हटले की, हा पंखा एका स्थानिक रहिवाशाने दान केला होता. यानंतर पोलिसांनी त्या रहिवाशाला शोधून काढत त्याचीही चौकशी केली. या रहिवाश्याने सांगितले की, त्याच्या मुलाने हा पंखा पाठवला होता. हा मुलगा सौदी अरेबियात स्थायिक असून त्याने हा पंखा तिथून पाठवला होता. त्यानंतर २०२३ मध्ये सदर पंखा मदरशाला देण्यात आला होता.
