पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे लिव्ह-इन संबंधांतील जोडप्याला संरक्षण

‘कायद्यात अशा प्रकारच्या नातेसंबंधांना मनाई करण्यात आलेली नाही किंवा असे संबंध ठेवणे हा गुन्हाही ठरत नाही.

कुणाही व्यक्तीला आपल्या जोडीदारासोबतच्या नात्याला विवाहाच्या माध्यमातून औपचारिक स्वरूप देण्याचा किंवा लिव्ह-इन संबंधांचा अनौपचारिक पर्याय स्वीकारण्याचा अधिकार आहे, असे सांगून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने लिव्ह-इन संबंधांतील एका जोडप्याला संरक्षण देणारा निकाल दिला आहे.

‘कायद्यात अशा प्रकारच्या नातेसंबंधांना मनाई करण्यात आलेली नाही किंवा असे संबंध ठेवणे हा गुन्हाही ठरत नाही. देशाच्या इतर कुणाही नागरिकाप्रमाणे या व्यक्तीही कायद्याचे समान संरक्षण मिळण्यास पात्र आहेत’ असे सांगतानाच, या जोडप्याच्या जिवाला किंवा स्वातंत्र्याला कुठलाही धोका होणार नाही याची खात्री करावी, असे निर्देश न्यायालयाने हरियाणा पोलिसांना दिले.

‘याचिकाकत्र्यांनी मागितलेले संरक्षण त्यांना मंजूर केल्यास समाजाची संपूर्ण सामाजिक रचना मोडकळीला येईल’ असे सांगून अशाच प्रकारच्या दोन याचिका पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या दोन वेगवेगळ्या एकल खंडपीठांनी यापूर्वी फेटाळून लावल्या होत्या. यानंतर काही दिवसांतच न्या. सुधीर मित्तल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. ‘लिव्ह-इन नातेसंबंध कायदेशीर नसून समाज त्याकडे नापसंतीच्य दृष्टीने पाहतो. त्यामुळे याचिकाकत्र्यांना संरक्षण दिले जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Punjab and haryana high court protects couple in live in relationship akp

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या