‘बीएसएफ’ची अधिकार मर्यादा वाढवण्याविरोधात पंजाबचा ठराव

चंडीगड : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकार क्षेत्राची मर्यादा वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात गुरुवारी पंजाब विधानसभेने ठराव मंजूर केला. केंद्राचा निर्णय पंजाब पोलिसांचा अपमान करणारा असल्याने तो मागे घेण्याची मागणी पंजाब सरकारने केली आहे.

चंडीगड : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकार क्षेत्राची मर्यादा वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात गुरुवारी पंजाब विधानसभेने ठराव मंजूर केला. केंद्राचा निर्णय पंजाब पोलिसांचा अपमान करणारा असल्याने तो मागे घेण्याची मागणी पंजाब सरकारने केली आहे.

बीएसएफच्या अधिकार क्षेत्राची मर्यादा १५ किलोमीटरवरून ५० किलोमीटर करण्यासाठी केंद्र सरकारने बीएसएफ कायद्यात गेल्या महिन्यात सुधारणा केली होती. त्याविरोधात पंजाब सरकारने सोमवारी विधानसभेत एकमताने ठराव मंजूर केला. या वेळी भाजपचे दोन आमदार अनुपस्थित होते. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी हा ठराव मांडला. 

पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसामच्या आंतरराष्ट्रीय सीमा भागात शोधमोहीम राबवणे, अटक व जप्तीची कारवाई करण्याबाबतचे बीएसएफचे अधिकारक्षेत्र १५ किमीपर्यंत मर्यादित होते. परंतु ते वाढवून ५० किमी करण्यासाठी केंद्राने ऑॅक्टोबरमध्ये संबंधित कायद्यात दुरुस्ती केली. केंद्राने याबाबतची अधिसूचना रद्द करावी अन्यथा न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असा इशाराही पंजाबचे उपमुख्यमंत्री रंधवा यांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Punjab assembly adopts resolution opposing extension of bsf jurisdiction zws

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका