Bhagwant Mann Punjab Election 2027 prediction: पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा जोरदार तयारी करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवणारा भाजपा पंजाबमध्ये सत्ता मोठ्या यशाची आशा बाळगत आहे. पण, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये २०२७ भाजपाला एक नाहीतर दोनच जागा मिळवता येतील, असा विश्वास मान यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री मान यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे कागदावरच लिहून दिले.

भाजपाला १-२ जागा मिळतील – भगवंत मान

‘एनडीटीव्ही’च्या वतीने नवा पंजाब समीट घेण्यात आली. या समीटमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांना आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आले. पश्चिम बंगालनंतर भाजपा पंजाब निवडणुकीत मोठं यश मिळविण्याबाबात आश्वासक असल्याचे दिसून येत आहे, या प्रश्नावर उत्तर देताना मान यांनी २०२७ मध्ये भाजपाला केवळ एक ते दोन जागांवर यश मिळवता येईल, असा दावा केला. एवढेच नव्हे तर मान यांनी थेट कागदारवरच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याची आकडेवारी दिली.

कोणत्या पक्षाला किती मिळतील जागा?

भगवंत मान यांनी केवळ भाजपाच नव्हे तर इतर पक्षांना देखील किती जागांवर यश मिळेल याची आकडेवारी कागदावर लिहली. मान यांनी २०२७ मध्ये काँग्रेसला १ ते ९ जागा मिळतील असा दावा केला. तर, अकाली दलाला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नाही असे सांगितले. मान यांनी या आकडेवारीच्या खाली स्वत:ची सही करुन निवडणुकीच्या निकालानंतर यावर चर्चा करुया, असे सांगितले. आम आदमी पक्षाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर बोलताना मान यांनी उरलेल्या सर्व जागा आपला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

पंजाबमध्ये आपचा विजयाचा विश्वास

भाजपा नेहमीच पंजाबविरोधी असल्याचा आरोप मुख्यमंत्री मान यांनी केला. भाजपा चंदीगडला केंद्र शासित प्रदेश करण्याची भाषा करते, भाक्रा आणि नांगल धरणाचे पाणी हरियाणाला देण्याचा भाषा वापरतात. भाजपाने जनतेत जाऊन लोकांची भावना जाणून घेतलेली नाही. भाजपा जिथं निवडणूक लढते तिथं हिंसाचार घडवून आणते, दंगे घडवून ते धुर्वीकरणाचे राजकारण करते, असा आरोप मान यांनी केला. पंजाबमध्ये विकास केल्याचा दावा करताना मान यांनी यामुळे राज्यातील नागरिक खूश असल्याचे सांगितले. पंजाब २०२७ मध्ये आमचं मन दुखावणार नाही, असे मान म्हणाले.