scorecardresearch

Premium

Video: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींवर चारोळी; जाहीर भाषणात म्हणाले, “मला तर शंका आहे त्यांना साधा…”!

भगवंत मान म्हणतात, “तुम्ही स्वत: जर शिकले असता तर तुम्हाला कळलं असतं की खर्च कसे होतात, कसे पूर्ण होतात. पण चौथीत तर…!”

bhagwant mann narendra modi
भगवंत मान यांचा नरेंद्र मोदींना टोला! (फोटो – पीटीआय संग्रहीत)

राजस्थानमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजस्थानमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली असून कामांना सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभाही होत आहेत. एकीकडे देशात एक देश, एक निवडणुकीची चर्चा होत असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राजस्थानमध्ये ‘केजरीवाल की गॅरंटी’ हा आम आदमी पक्षाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना त्यांच्या खास शैलीत चारोळी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला!

नेमकं काय झालं?

या कार्यक्रमासाठी आम आदमी पक्षाची अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचाही समावेश होता. भगवंत मान यांनी आपल्या भाषणामध्ये मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. महाविद्यालयांमधील वस्तीगृहांच्या शुल्कावर सरकार जीएसटी लावण्याची तयारी करत असल्याचं सांगत त्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

shivraj singh chouhan
पुन्हा मुख्यमंत्री व्हावे की नाही? चौहान यांचा लोकांना सवाल!
vijay wadettiwar ajit pawar
“अजित पवारांचं हे नेहमीचं आहे, ते कधी नाराज…”, काँग्रेस नेत्याचा टोला; म्हणाले, “…म्हणून त्यांना हे राजकीय आजार होतायत!”
Kangana Called The Leaders Of The Opposition Alliance Corrupt
“पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील”, कंगना रणौतचे नरेंद्र मोदींबद्दल विधान; म्हणाली, “त्यांना भीती वाटेलच कारण…”
Manoj Jarange and Pallavi Jarange
“माझा बाप मला परत हवाय, आम्हाला आरक्षण…”, जरांगे पाटलांच्या मुलीची सरकारकडे आर्त मागणी

“मोदी कधीही अशी घोषणा करू शकतात की…”

“आता महाविद्यालयांमधल्या वस्तीगृहांच्या शुल्कावरही १२ टक्के जीएसटी लावण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. त्यामुळे आता मोदीजी कधीही अशी घोषणा देऊ शकतात की “ना मी शिकलो, ना इतर कुणाला शिकू देणार”, असा टोला भगवंत मान यांनी लगावला.

“मोदी स्वत: शिकले असते तर…”

“तुम्ही स्वत: जर शिकले असता तर तुम्हाला कळलं असतं की खर्च कसे होतात, कसे पूर्ण होतात, खानावळीची बिलं कशी दिली जातात. आता चौथीत तर वस्तीगृहाची गरज पडत नाही. ते कधी वस्तीगृहात राहिले असते तर समजलं असतं”, अशी टीका भगवंत मान यांनी मोदींवर केली.

“तुम्ही काम बंद करूनच दाखवा”, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान…

“मी तर संसदेतच बोललो होतो. ते तेव्हा माझ्यासमोरच बसले होते”, असं म्हणत भगवंत मान यांनी मोदींवर एक चारोळी यावेळी ऐकवली.

“१५ लाख की रकम लिखता हूँ तो कलम रुक जाती है
काले धन के बारे में सोचता हूँ तो स्याही सूख जाती है
हर बात ही जुमला निकली..
अब तो ये भी शक है, क्या चाय बनानी आती है?”

“मला वाटत नाही त्यांना चहा बनवता येत असेल. कारण त्या काळात ते रेल्वेस्थानकच नव्हतं. हे अतीच आहे. देशाला काहीतरी सत्य सांगा. जो कुणी भाजपावाला येतो, तो जुमल्यांवरच बोलत असतो”, असं भगवंत मान यावेळी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab cm bhagwant mann mocks pm narendra modi in rajasthan election rally pmw

First published on: 05-09-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×