Video : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यात पडलेल्या गायीला वाचवलं; आशीर्वाद घेत म्हणाले, “तुम्ही वाचलात, मावशी”

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सोमवारी रात्री उशिरा खड्ड्यात पडलेल्या गायीला वाचवले आहे.

punjab-cm-rescue-cow

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सोमवारी रात्री उशिरा खड्ड्यात पडलेल्या गायीला वाचवले आहे. त्यांचे गायीला वाचवतानाचे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री घरी जात असताना त्यांना रस्त्यावर जमाव जमलेला दिसला. नेमकं काय चाललंय, हे पाहण्यासाठी तो त्यांच्या वाहनातून खाली उतरले. त्यावेळी तिथं जमलेले लोक खोल खड्ड्यात पडलेल्या एका गायीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मुख्यमंत्री चन्नी गायीला वाचवण्यासाठी त्यांच्या मदतीला गेले. तसेच त्या गायीला बाहेर कसं काढता येईल, याबाबत जमलेल्या लोकांशी चर्चा करताना दिसून आले.

गाय अतिशय खोल आणि अरुंद खड्ड्यात पडली असल्याने तिला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. या रेस्क्यू ऑपरेशनला बराच वेळही लागला. मात्र, जोपर्यंत त्या गायीला बाहेर काढण्यात यश आलं नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळ सोडले नाही. शेवटी, सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर या खड्ड्यातून गायीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ही बचाव मोहीम लाईव्ह शेअर केली. गायीला वाचवण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांचं नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.

यावेळी मुख्यमंत्री चन्नी यांनी तिथं जमलेल्या लोकांची विचारपूस केली. तसेच एका व्यक्तीने आपण बेरोजगार असल्याचे सांगितल्यावर चन्नी यांनी त्याला भेटायला येण्यास सांगितले. “आम्ही तुम्हाला काम शोधून देऊ,” असे मुख्यमंत्री क्लिपमध्ये बोलत आहेत. दरम्यान, गायीला निरोप देताना त्यांनी आशीर्वादही घेतला. तसेच “तुम्ही वाचलात, मास्सी (मावशी), काळजी घ्या” असं म्हणत मुख्यमंत्री निघून गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Punjab cm helps rescue cow fallen in deep pit video goes viral hrc

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या