scorecardresearch

“अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना २४ तासांत सोडावं, अन्यथा…”, शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचा पंजाब सरकारला इशारा

पंजाब पोलीस अमृतपालचा हरियाणा, उत्तरप्रदेश आणि नेपाळच्या सीमेवर शोध घेत आहेत.

amritpal singh supporters in anti national activities
अमृतपाल सिंग, (REUTERS Photo)

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंग अलीकडच्या काही दिवसांपासून फरार आहे. पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा देशभरात शोध घेत आहेत. तरीही, अमृतपाल सिंग पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. पोलिसांनी अमृतपालच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. पण, त्यांना सोडण्यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहे. शिख संघटन जत्थेदार अकाल तख्तने अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना २४ तासांत सोडण्यात यावं, असा इशारा दिला आहे.

शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे ( एसजीपीसी ) प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी सांगितलं की, “सरकारने २४ तासांत अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना सोडून द्यावं. जर सरकारने त्यांना सोडलं नाहीतर, एसजीपीसी गावा-गावांत जाऊन लोकांना जागरूक करेल.”

हेही वाचा : थरकाप उडवणारी घटना! घरात मांस न आणल्याने पतीने गाठली क्रूरता, तीन मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरला अन्…

“पोलिसांनी ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क साधल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे,” अशी माहिती धामी यांनी दिली आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, अमृतपाल सिंग हरियाणातील बलजीत कौर या महिलेच्या घरी थांबला होता. तिला तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर बोलताना बलजीतने सांगितलं की, “मी अमृतपालला ओळखत नव्हती. माझी पप्पलप्रीत बरोबर इंन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. अमृतपालला पप्पलप्रीतच घरी घेऊन आला होता. दोघांनी जेवण केलं. अमृतपालने आपल्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला, तेव्हाची त्याची ओळख पटली.”

“जायच्या आधी मोबाईलमध्ये…”

हेही वाचा : “मी पंतप्रधान मोदींसंदर्भात…”, ‘ते’ ट्वीट व्हायरल होताच खुशबू सुंदर यांचं स्पष्टीकरण; काँग्रेसवरही साधला निशाणा!

“अमृतपालने माझ्या मोबाईलचा वापर केला होता. दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी लवकर उठले. अमृतपाल घरातच होता, तर पप्पलप्रीत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर दोघेही दीड वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले. जाण्यापूर्वी अमृतपालने मोबाईलमध्ये काहीतरी शोधलं होतं,” असं बलजीत कौरने म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 17:52 IST

संबंधित बातम्या