उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी पुष्करसिंह धामी यांची निवड

तिरथसिंह रावत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी धामी यांची  निवड करण्यात आली.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते पुष्करसिंह धामी (४५) यांची निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. धामी यांची शनिवारी भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांचा शपथविधी रविवारी होईल.

धामी हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असतील, तिरथसिंह रावत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी धामी यांची  निवड करण्यात आली.

आपल्या पक्षाने सर्वसामान्य कार्यकत्र्याची नियुक्ती केली आहे, असे धामी यांनी म्हटले आहे, धामी हे सीमेवरील पीठोरगड जिल्ह्यातील असून त्यांचे वडील माजी सैनिक आहेत. सर्वांच्या सहकार्याने आपण जनतेच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे धामी म्हणाले. धामी हे उधमसिंहनगर जिल्ह्यातील खातिमा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

राज्याचे मावळते मुख्यमंत्री तिरथसिंह रावत आणि प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी धामी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह अनेक आमदारांनी अनुमोदन दिले. भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर धामी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज भवनला रवाना झाले.

दरम्यान, भाजपमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून पक्षाने जनतेशी प्रतारणा केली असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे आव्हान

राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असल्याने आणि उत्तराखंड भाजपला गटबाजीने ग्रासले असल्याने पक्षाला पुन्हा विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान धामी यांच्यासमोर आहे. अल्पावधीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बदलावा लागल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मानले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pushkar singh dhami elected as chief minister of uttarakhand akp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या