scorecardresearch

गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला पुतिन अनुपस्थित

शीतयुद्ध संपुष्टात आणणारे ‘युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक्स’चे (सोव्हिएत संघ) अखेरचे अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या पार्थिवावर शनिवारी हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला पुतिन अनुपस्थित
गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला पुतिन अनुपस्थित

मॉस्को : शीतयुद्ध संपुष्टात आणणारे ‘युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक्स’चे (सोव्हिएत संघ) अखेरचे अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या पार्थिवावर शनिवारी हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी निधन झाले होते. ते ९१ वर्षांचे होते.

युरोपला विभाजित करणारी राजकीय सीमा संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या गोर्बाचेव्ह यांचे युरोपमध्ये नेहमीच कौतुक होते. पण, सोव्हिएत संघाच्या विघटनास जबाबदार ठरणारी पावले उचलल्याबद्दल रशियात मात्र त्यांचे अनेक टीकाकार आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गोर्बाचेव्ह यांना गुरुवारी श्रद्धांजली अर्पण केली होती. क्रेमलिनने सांगितले  की, पुतिन यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे ते गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला  उपस्थित राहू शकले नाहीत. गोर्बाचेव्ह यांच्या पार्थिवावर  मॉस्कोतील नोवोडदेविची स्मशानभूमीत दफनसंस्कार झाले. त्यांची पत्नी रायसा यांच्या थडग्याशेजारी दफन करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.