scorecardresearch

युक्रेनसोबत युद्ध सुरु असतानाच पुतीन यांना मोठा धक्का; वरिष्ठ अधिकाऱ्याने पायउतार होत सोडला देश; म्हणाला…

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देश सोडल्याने रशियासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देश सोडल्याने रशियासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे

युक्रेनसोबत युद्ध सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना मोठा धक्का बसला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याने नाराज असलेल्या रशियन हवामान दूताने पायउतार होत देश सोडला आहे. पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने Anatoly Chubaisनाराज असल्याचं या घडामोडीशी संबंधित दोघांनी सांगितलं आहे. ब्लूमबर्ग न्यूजने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देश सोडल्याने रशियासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.

६६ वर्षीय चुबैस हे १९९० च्या दशकातील काही आर्थिक सुधारकांपैकी एक असून पुतीन यांच्या सरकारमध्ये राहिले होते. त्यांनी पाश्चात्य देशांसोबत चांगले संबंध ठेवले होते. क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी यासंदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.

रशियाच्या १९९० च्या दशकातील खासगीकरणाचे शिल्पकार म्हणूनही चुबैस यांना ओळखलं जातं. पुतीन सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकासासाठी दूत म्हणून नियुक्ती होईपर्यंत त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली.

चुबैस यांनी मंगळवारी सहकारी आणि मित्रांना पत्र लिहिलं. यामध्ये त्यांनी आपण पदावरुन पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी अंधकारमय दृष्टिकोनाचा इशारा दिला. सहकारी आर्थिक सुधारक माझ्यापेक्षा धोरणात्मक धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत होते आणि मी चुकीचा होतो असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Putin adviser chubais quits over ukraine war leaves russia sgy

ताज्या बातम्या