Quad warning aggressive China change status Hindu Pacific region ysh 95 | Loksatta

आक्रमक चीनला ‘क्वाड’चा इशारा; हिंदू-प्रशांत क्षेत्राच्या स्थितीत एकतर्फी बदल नको

हिंदू-प्रशांत भागातील ‘जैसे थे’ परिस्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाऊ नये, असे ‘क्वाड’ गटाने म्हटले आहे.

आक्रमक चीनला ‘क्वाड’चा इशारा; हिंदू-प्रशांत क्षेत्राच्या स्थितीत एकतर्फी बदल नको
(सांकेतिक छायाचित्र)

पीटीआय, न्यूयॉर्क : हिंदू-प्रशांत भागातील ‘जैसे थे’ परिस्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाऊ नये, असे ‘क्वाड’ गटाने म्हटले आहे. तैवानसह दक्षिण चीन सागरात आक्रमक हालचाली करणाऱ्या चीनला हा इशारा देण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका सदस्य असलेल्या ‘क्वाड’ गटाची बैठक झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह चारही देशांचे परराष्ट्रमंत्री बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर गटाकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. ‘‘आंतरराष्ट्रीय कायदे, स्वातंत्र्याची तत्त्वे, लोकशाही मूल्ये यासह कोणत्याही वादावर शांततामय तोडगा काढला जायला हवा. एखाद्या बाजूने त्यात एकतर्फी बदल करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला आमचा विरोध असेल,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> भारताला ‘मुस्लीम राष्ट्र’ बनवण्याचा कट; ‘पीएफआय’बाबत ‘एनआयए’चा दावा : तरुणांना दहशतवादी कारवायांत ओढण्याचे प्रयत्न 

हेही वाचा >>> शंकराचार्यपदी अविमुक्तेश्वरानंदांची निवड संन्यासी आखाडय़ांना अमान्य

दक्षिण चिनी समुद्राच्या जवळपास सर्वच विवादित भागांवर चीन आपला हक्क सांगत आहे. त्याचवेळी तैवान, फिलिपिन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम ही राष्ट्रेही या भागांवर हक्क सांगत आहेत. चीनच्या या आक्रमकतेला दक्षिण आशियातील ‘नाटो’ समजल्या जाणाऱ्या क्वाड गटाने प्रत्युत्तर दिल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>> पाकिस्तानची भाषा शांततेची, पण मदत दहशतवाद्यांना; शाहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील वक्तव्याला भारताचे प्रत्युत्तर

सुरक्षा परिषदेचा लवकरच विस्तार?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ‘क्वाड’ देशांनी स्पष्ट केले. जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताला कायम सदस्यत्व मिळावे, ही अनेक देशांची मागणी आहे. आता अमेरिकेचा सहभाग असलेल्या ‘क्वाड’नेही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुरक्षा परिषदेतील त्रुटी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पाकिस्तानची भाषा शांततेची, पण मदत दहशतवाद्यांना; शाहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील वक्तव्याला भारताचे प्रत्युत्तर

संबंधित बातम्या

“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
Thackeray vs Shinde: ‘सेनेतच आहात तर…’, BMC निवडणूक, OBC आरक्षण, दीड लाख प्रतिज्ञापत्रे; ठाकरेंच्या युक्तिवादातील २० मुद्दे

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार