अयोध्येत Radisson Hotel Group ने आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, अयोध्येत १५० खोल्यांचं Radisson Blu Hotel तयार करण्यात येणार असून त्यासाठी EaseMyTrip बरोबर करार करण्यात आला आहे. EaseMyTrip च्या भागीदारीत जीवनी हॉस्पिटॅलिटीद्वारे एक ग्रीनफील्ड प्रकल्प, हॉटेल विकसित केले जात आहे आणि ते २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हे रॅडिसन हॉटेल ग्रुपचे अयोध्येतील दुसरे हॉटेल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे हॉटेल अयोध्येच्या श्री राम मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे . हे महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या रेल्वे स्थानकापासून सोयीस्कर अंतरावर आहे आणि पुढे राष्ट्रीय महामार्ग-२७ जवळ आहे. “पाहुणे २-५ किलोमीटरच्या आत असलेली इतर धार्मिक स्थळे देखील पाहू शकतात. हनुमान घरी, कनक भवन, नागेश्वरनाथ मंदिर आणि त्रेता के ठाकूरसारख्या धार्मिक स्थळांचे ते भेट घेऊ शकतात”, असे एका निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radisson hotel group announces signing of 150 room radisson blu hotel ayodhya in partnership with jeewani hospitality and easemytrip sgk
First published on: 20-02-2024 at 19:29 IST