आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी राघव बहल यांच्या निवासस्थानी आणि त्यांनी सुरु केलेल्या ‘द क्विंट’ या न्यूज पोर्टलच्या कार्यालयावर छापा टाकला. कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाच्या पथक या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत. बहल यांनी क्विंटसह नेटवर्क १८ समुहाचेही संस्थापक आहेत.
आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी राघव बहल यांच्या निवासस्थानी आणि त्यांनी सुरु केलेल्या ‘द क्विंट’ या न्यूज पोर्टलच्या कार्यालयावर छापा टाकला. कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाच्या पथक या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
राघव बहल यांनी एडिटर्स गिल्डलाही यासंदर्भात माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर राघव बहल यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यांनी छाप्यादरम्यान कार्यालयातील पत्रकारांकडील कागदपत्रांची तपासणी करु नये. पत्रकारितेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे आहेत. जर त्यांनी असे केले तर आम्ही याचा तीव्र निषेध करु. आमच्या या विनंतीची दखल घेतली जाईल अशी आशा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच अधिकाऱ्यांनी मोबाईल फोनव्दारे कागदपत्रे स्कॅन करुन अधिकाराचा दुरुपयोग करु नये, असेही त्यांनी सांगितले.
My note to the @IndEditorsGuild. pic.twitter.com/l1Gwmf1dDl
— Raghav Bahl (@Raghav_Bahl) October 11, 2018