scorecardresearch

Video: कॅमेऱ्याची फिकीर कुणाला? देशाभिमानच सर्वोच्च! राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीत सुरू होताच युवक…!

राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीतादरम्यान दिसलं युवकाचं राष्ट्रप्रेम!

rahul gandhi bharat jodo yatra (1)
राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीतादरम्यान दिसलं युवकाचं राष्ट्रप्रेम! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेच्या समारोपप्रसंगी राहुल गांधींनी बर्फवृष्टी सुरू असताना केलेल्या भाषणाचे व्हिडीओ आणि फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. या भाषणामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करतानाच इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली त्या वेळच्या भावनिक आठवणी सांगत आपल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली. तसेच, द्वेषाचं राजकारण न करता सगळ्यांनी मिळून काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, बर्फवृष्टी होत असतानाचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे फोटो जसे व्हायरल होत आहेत, तसाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे तो सभेनंतरचा!

नेमकं घडलं काय?

राहुल गांधींची सभा संपल्यानंतर प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत झालं आणि सभा संपल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. भाषण संपल्यानंतर राहुल गांधी स्टेजवरून खाली उतरण्यासाठी निघाले असताना त्यांना राष्ट्रगीतासाठी पुन्हा पुढे बोलवण्यात आलं. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची बहीण प्रियांका गांधी, जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसची नेतेमंडळी आणि मोठ्या संख्येनं जमलेले कार्यकर्ते उपस्थित होतं. उत्तरेकडच्या थंडीतही राहुल गांधी टी-शर्टवर फिरल्याची जोरदार चर्चा झाली होती. तशीच, आता राहुल गांधींनी बर्फवृष्टी होत असतानाही भाषण केल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी त्यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीतादरम्यान एक युवक स्टेजच्या खाली उजव्या कोपऱ्याच स्टेजकडे तोंड करून उभा असल्याचं पाहायला मिळत आहे.

rahul gandhi bharat jodo yatra (1)
राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीतादरम्यान दिसलं युवकाचं राष्ट्रप्रेम! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“…आणि मला समजलं माझ्या बाबांचा मृत्यू झाला”, राहुल गांधींनी सांगितली मनातली वेदना

आपण शाळेत असताना लहानपणापासूनच राष्ट्रगीत चालू असताना सरळ आणि अजिबात न हलता उभं राहण्याचं मार्गदर्शक मूल्य सगळ्यांच्याच मनावर बिंबवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकदा अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्यावर आपण आहे त्याच अवस्थेत सरळ उभं राहातो. राहुल गांधींच्या सभेनंतर अगदी तसंच काहीसं चित्र जम्मू-काश्मीरमध्ये दिसून आलं. राष्ट्रगीत चालू असताना स्टेजवरची आणि स्टेजच्या आजूबाजूचीही सगळी मंडळी समोरच्या बाजूला म्हणजेच प्रेक्षक आणि कॅमेरे असलेल्या दिशेला तोंड करून उभी राहिल्याचं दिसत होतं. मात्र, स्टेजच्या उजवीकडे एक युवक स्टेजच्याही मागच्या दिशेला तोंड करून उभा असल्याचं पाहायला मिळालं.

असं का झालं?

खरंतर सगळेजण समोर प्रेक्षकांकडे आणि अर्थात कॅमेऱ्याकडे तोंड करून उभे असताना हा युवक मात्र स्टेजच्या मागे तोंड करून उभा असल्याचं दिसत होतं. राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी आधी सगळ्यांना सतर्क केलं जातं. राहुल गांधींच्या भाषणानंतरही इथे सगळ्यांना राष्ट्रगीतासंदर्भात सतर्क करण्यात आलं होतं. मात्र, आजूबाजूला लोकांचे आवाज आणि घोषणाबाजीमुळे तो संदेश काहींना कदाचित ऐकू गेला नसावा. त्यामुळे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर अचानक सगळे स्तब्ध झाले. त्यावेळी हा युवकही समोरच्या बाजूला किंवा कॅमेऱ्याकडे तोंड करण्याचा कोणताही विचार न करता आहे त्याच अवस्थेत सरळ स्तब्ध उभा राहिला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:17 IST
ताज्या बातम्या