scorecardresearch

Premium

बलात्कार करून रस्त्यावर फेकल्यानंतर अल्पवयीन मुलगी मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत फिरली, राहुल गांधी म्हणाले…

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका १२ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करून नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं. यावरून राहुल गांधींनी सरकारवर सडकून टीका केली.

Rahul Gandhi on Madhya Pradesh rape on minor girl
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका १२ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करून नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं आहे. यानंतर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित मुलीने मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे सरसावलं नाही. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरून सरकारवर सडकून टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, “मध्य प्रदेशमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीबरोबर भयानक गुन्हा घडला. त्यामुळे भारत मातेच्या हृदयावर मोठा आघात झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये महिलांविरोधातील गुन्हे आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची संख्या सर्वाधिक आहे. याला ज्यांनी गुन्हा केला ते गुन्हेगार तर जबाबदार आहेतच, शिवाय राज्यातील भाजपा सरकारही जबाबदार आहे. भाजपा सरकार मुलींचं संरक्षण करण्यास सक्षम नाही.

old people hunger strike Karanja
वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर
minor raped half naked and bleeding viral video
“फाशी द्या किंवा गोळ्या घाला”, उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची मागणी
MNS Protest
“टोलनाक्यावर दगडं मारून एकनाथ शिंदे…”, मनसे नेत्याची टीका; आंदोलन केल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात!
crime pune
रस्त्याच्या कडेला आढळला डान्स बारमधील तरुणीचा मृतदेह, तपासानंतर समोर आलं धक्कादायक कारण

“मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना थोडीही लाज वाटत नाही”

“मध्य प्रदेशमध्ये ना न्याय आहे, ना कायदा सुव्यवस्था आणि ना अधिकार. आज मध्य प्रदेशमधील मुलींच्या अवस्थेवर संपूर्ण देशाला लाज वाटते आहे. मात्र, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान दोघांना थोडीही लाज वाटत नाही. निवडणुकीची भाषणं, खोटी आश्वासनं आणि फसव्या घोषणांमध्ये मुलींचा आवाज दाबला जात आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्यावर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आलं होतं.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओमध्ये ही मुलगी एका गल्लीतून फिरताना दिसत आहे. ती एका छोट्याशा कपड्याने स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, घराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे तिने मदत मागितली. मात्र संबंधित व्यक्तीने तिला हाकलून दिलं.

हेही वाचा : संतापजनक: बलात्कार करून रस्त्यावर फेकलं; अल्पवयीन मुलीने अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत मागितली मदत पण…

याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन शर्मा म्हणाले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींची लवकरात लवकर ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. पीडित मुलगी नेमकी कुठली आहे? याबाबत ती काहीही सांगू शकली नाही. मात्र तिच्या बोलण्यावरून ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul gandhi comment on rape on minor girl in madhya pradesh pbs

First published on: 28-09-2023 at 10:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×