scorecardresearch

Video: “राहुल गांधींचं निलंबन ही काँग्रेससाठी सुसंधी”, काय आहेत कारवाईमागचे अन्वयार्थ? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

नरेंद्र मोदींच्या अवमान प्रकरणी सुरतमधील जिल्हा न्यायालयानं राहुल गांधीना दोषी मानल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

rahul gandhi disqualified
राहुल गांधींची खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी रद्द केली आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राहुल गांधींना गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयानं मोदींच्या अवमान प्रकरणी दोषी मानून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे नेमके राजकीय अर्थ आणि पडसाद काय असतील, यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सोप्या शब्दांत विश्लेषण केलं आहे.

“सुरतच्या न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर ज्या वेगानं पुढच्या सगळ्या कारवाया झाल्या, ते खरंच कौतुकास्पद आहे. खरं तर राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व निलंबन ही काँग्रेससाठी महत्त्वाची सुसंधी आहे”, असं निरीक्षण गिरीश कुबेर यांनी नोंदवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 16:52 IST

संबंधित बातम्या