Revati Sule Reception Viral Video : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं म्हणजेच रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचा रिसेप्शन सोहळा १० ऑगस्ट दिल्लीत पार पडला. या सोहळ्याला देशभरातली अनेक मान्यवर मंडळी हजर होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. तसंच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्राही या सोहळ्यात हजर होत्या. दरम्यान, या सोहळ्यातील एक फॅन मोमेंट आता व्हायरल झाला आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींना व्यासपीठावरच एका फॅन व्यक्तीची ओळख करून दिली. हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेवती सुळेच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण गांधी कुटुंब दिल्लीत हजर होते. त्यांनी व्यासपीठावर येत नव वधू-वराला शुभेच्छा दिल्या. या सर्वांचं छान फोटो सेशनही झालं. फोटो काढून झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी राहुल गांधींना बाजूला नेलं. व्यासपीठावरच बाजूला स्मृती शिंदे उभ्या होत्या. स्मृती शिंदे तुमच्या मोठ्या फॅन आहेत, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींची भेट घडवून आणली. “हा मोठा फॅन मोमेंट आहे”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फोटो काढण्याची विनंती केली. यानंतर राहुल गांधींनी स्मृती शिंदेंबरोबर फोटोही काढला.

कोण आहेत स्मृती शिंदे?

स्मृती शिंदे म्हणजेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या बहिण आहेत. स्मृती शिंदे यांना दोन मुलं असून वीर पहाडिया हा बॉलिवूडमध्ये कार्यरत असून संजय पहाडिया व्यावसायिक आहे. वीर पहाडिया सध्या अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच हे विवाहबंधनात अडकणार आहेत.

रोहित पवार आणि पंतप्रधान मोदींच्या गप्पा

भाजपावर आणि केंद्र सरकारवर खरपूस टीका करणारे आमदार रोहित पवार या समारंभात पंतप्रधान मोदींशी हितगुज साधताना दिसून आले. पवार कुटुंबातील सदस्यांची पंतप्रधान मोदींशी भेट घालून देण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि रोहित पवार यांच्यात काही वेळ संवाद झाला. यावेळी युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली.

रेवती सुळेच्या रिसेप्शनला गांधी कुटुंबाची हजेरी

अमित शाह आणि शरद पवारांचा संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांशी संवाद साधल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शरद पवार यांनी रिसेप्शन सोहळ्यात प्रमुख नेत्यांशी संवाद साधला.